भजी : बाहेर पाऊस पडत असताना घरात भजी तळली जाणं हे ठरलेच, कारण अशावेळी भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. ज्याला आपण पकोडे किंवा भजी अशा नावानेही ओळखतो. त्याला इंग्रजीमध्ये फ्रिटर्स (Fritters) असे म्हणतात. यातही कांदा भजी म्हंटलं की, ऑनियान फ्रिटर्स.
जिलेबी : नाश्त्यात गोड खाण्याची इच्छा असेल बरेच लोक गरमागरम जिलेबी खाणे पसंत करतात. काहींना ती दह्यासोबत खायला आवडते, तर काहींना राबडीबरोबर. या जिलेबीला इंग्रजीत 'फनेल' (Funnel) असे म्हणतात.
समोसा : देशातील सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या स्नॅक्समध्ये समोशाचे नाव प्रथम येते. लोक जवळजवळ दररोज त्याचा आनंद घेतात. या तुमच्या समोसाला इंग्रजीत 'रिसोल' (Rissole) असं म्हणतात.
बर्फी : कुणाच्या घरी मिठाई नेणे असो किंवा काही शकुनासाठी असो. आपल्याकडे शुभकार्याची सुरुवात बर्फीसोबत तोंड गोड करूनच होते. याच बर्फीला इंग्रजीत बर्फी (Burfi) म्हणतात.
पनीर : शाकाहारी लोकांच्या आवडत्या डिशमध्ये पनीर प्रथम येतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे पनीर अनेक घरांमध्ये बनवले जाते. पनीरला इंग्रजीत 'इंडियन कॉटेज चीज' (Indian cottage cheese) असे म्हणतात.
चिकू : मऊ खाण्यासाठी सोपं आणि लहान मुलांचं आवडतं गोड फळ चिकूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे क्वचितच कुणाला माहित असेल. चिकूला इंग्रजीमध्ये सापोडिल्ला (Sapodilla) असे म्हणतात.
हिंग : जवळजवळ सर्वच घरांमध्ये भाज्यांची आणि विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी हिंग वापरले जाते. या हिंगाचे इंग्रजी नाव अवघड आहे. हिंगाला इंग्रजीमध्ये अॅसाफोटीडा (Asafoetida) असे म्हणतात.
साबुदाणा : उपवासाचा सर्वात महत्वाचा आणि बहुतेक लोकांचा आवडता साबुदाणा याचे इंग्रजी नाव तुम्हाला माहितीये.? साबुदाण्याला इंग्रजीमध्ये टॅपिओका सागो (Tapioca Sago) असे म्हणतात.
ढेमसे : टोमॅटोचा एक एक पौष्टिक आणि हेल्दी प्रकार म्हणजे ढेमसे. हे नाव ऐकूनच बरेच जण ते खाणे टाळतात. या ढेमश्याला इंग्रजीमध्ये अॅप्पल गार्ड (Apple Gourd) असे म्हणतात.