NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / वाढते यूरिक अ‍ॅसिड किडनी करू शकते डॅमेज, या पदार्थांनी करू शकता कंट्रोल

वाढते यूरिक अ‍ॅसिड किडनी करू शकते डॅमेज, या पदार्थांनी करू शकता कंट्रोल

यूरिक अ‍ॅसिडमुळे किडनी हळूहळू कमकुवत होऊ शकते. यूरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे किडनी डॅमेज होऊ शकते. किडनी शरीरातील आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते मात्र. मात्र यूरिक अ‍ॅसिड किडनीसोबत संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.

19

साधारणपणे आपल्या शरीरातील यूरिक अ‍ॅसिड रक्तात विरघळते. यूरिक अ‍ॅसिड किडनीद्वारे फिल्टर केले जाते आणि लघवीद्वारे शरीराबाहेर जाते. मात्र जर तुम्ही जास्त प्रमाणात प्युरीन युक्त अन्न खाल्ल्यास शरीरात यूरिक अ‍ॅसिड जमा होऊ शकते.

29

हायपरयुरिसेमिया ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त राहते आणि त्यामुळे अनेकदा संधिरोग होतो. यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने सांधेदुखीचा त्रास होतो. तुमच्या आहाराचे नियमन करून शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित ठेवता येते.

39

पाणी : यूरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास पाण्याचे सेवन वाढवावे. यूरिक अ‍ॅसिड फिल्टर करण्यास पाण्याची खूप मदत होते. त्यामुळे दिवसभरात भरपूर म्हणजेच किमान 10 ग्लास पाणी प्यायल्यास फायदा होतो.

49

स्प्राउट्स : यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हरभरे, ओट्स, आणि स्प्राउट्स यांसारखे संपूर्ण धान्य फायदेशीर ठरेल. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच जीवनसत्त्वेही मुबलक प्रमाणात आढळतात.

59

भाज्या : यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी भाज्या खाव्या. भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यासाठी आहारात गाजर, बीटरूट, ब्रोकोली, पुदिना, टोमॅटो, काकडी या भाज्यांचा समावेश करावा.

69

लिंबूवर्गीय फळे : लिंबूवर्गीय फळे, जसे की संत्री आणि लिंबू, व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिडमध्ये जास्त असतात. व्हिटॅमिन सी अतिरीक्त यूरिक अ‍ॅसिड सहजपणे काढून टाकण्यास मदत करते आणि हे अन्नपदार्थ आपल्याला शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

79

ग्रीन टी : अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ग्रीन टी शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे संश्लेषण कमी करू शकते. गाउट ग्रस्त लोकांसाठी ग्रीन टी हे एक उत्तम पेय आहे.

89

केळी : जर तुम्हाला यूरिक अ‍ॅसिडच्या वाढीव पातळीमुळे संधिरोग झाला असेल तर दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या रक्तातील यूरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत होईल.

99

सफरचंद : सफरचंदांमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते, जे यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करते. फायबर यूरिक अ‍ॅसिड शोषून घेते आणि शरीरातील अतिरिक्त यूरिक अ‍ॅसिड काढून टाकते.

  • FIRST PUBLISHED :