फ्रीजचा वापर आपण केवळ थंड पाण्यासाठीच करतो असे नाही. फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ साठवून ठेवत असतो. कारण त्यामध्ये ते जास्त काळ टिकतात.
फ्रिजमध्ये साठवलेले पदार्थ चांगले राहावे यासाठी फ्रिजचं आयडियल म्हणजेच आदर्श तापमान काय असायला हवं. याबद्दल E Times ने सविस्तर माहिती दिली आहे.
विविध संशोधनांनुसार, फ्रीजचे तापमान जास्त ठेवल्यास फ्रिजचे वातावरण अन्नासाठी गरम होते. यामुळे फ्रिजमधील अन्न लवकर खराब होते.
खूप थंड तापमान सेट केल्यानेही अन्न खराब होऊ शकते. यामुळे फ्रीझर बर्न होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामुळेही अन्नामध्ये जीवाणू तयार होऊ शकतात.
मात्र आपण ऋतूनुसार तापमान पाहिजेत. तसेच प्रत्येक ऋतूमध्ये तापमान सेट करण्यापूर्वी फ्रीज स्वच्छ आणि निर्जंतुक करणे महत्वाचे आहे.
वेस्ट अँड रिसोर्सेस अॅक्शन प्रोग्रामनुसार, युनायटेड किंगडममधील निम्म्या घरांमध्ये त्यांचे रेफ्रिजरेटर आवश्यक तापमानापेक्षा जास्त 7 अंश सेल्सिअसवर सेट केले जातात. मात्र रेफ्रिजरेटरचे आदर्श तापमान 0 ते 5 अंश सेल्सिअस दरम्यान असावे.