हायपरटेन्शनला अनेकदा सायलेंट किलर म्हणून संबोधले जाते. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, रक्त संपूर्ण शरीरात पोहोचण्यापासून रोखते आणि हृदयावर दबाव पडतो तेव्हा उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशर होते.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, शरीरात चरबी जमा होणे, मधुमेह, किडनी निकामी होणे आदींमुळे उच्च रक्तदाब होतो. हिरव्या पालेभाज्या, फळे, काजू यांसारख्या संतुलित आहाराचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
मुळा : मुळ्यामध्ये मिनरल्स आणि पोटॅशियम असतात. मुळा तुम्ही कच्चा किंवा भाजीच्या स्वरूपातही खाऊ शकता. यानेही तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रित राहते.
लसूण : ब्लडप्रेशरच्या रुग्णासाठी लसूण खूपच फायदेशीर असतो. रोज सकाळी रिकाम्यापोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रित राहते.
कांदा : कांद्याच्या नियमित सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. कांद्यामध्ये क्लोरिसिटीन नावाचे एक अँटिऑक्सिडंट आढळते, या अँटिऑक्सिडंटमुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
लिंबू : हाय ब्लडप्रेशर त्वरित कमी करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरते. हाय ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात अर्धे लिंबू टाकून नियमित प्यावे. याने फायदा होतो.
तुळस : तुळस आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा देते. तुळशीची आणि कडुलिंबाची काही पाने कृष्ण करून पाण्यामध्ये टाकून प्यावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
आले : आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट तत्व असतात. हे अँटिऑक्सिडंट खराब कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
वेलची : नियमित वेलचीचे सेवन केल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. वेळचीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात आणि यामुळे रक्ताभिसरणंही व्यवस्थित होते.
पायऱ्या चढणे : लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. दररोज व्यायाम केल्याने ब्लडप्रेशर सोबत तुमचे एकूणच आरोग्य सुरक्षित राहते.