NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Cleaning Tips : खराब झालेल्या प्लास्टिक खुर्च्या 5 मिनिटात होतील चकाचक, वापरा हा घरगुती उपाय

Cleaning Tips : खराब झालेल्या प्लास्टिक खुर्च्या 5 मिनिटात होतील चकाचक, वापरा हा घरगुती उपाय

जवळपास प्रत्येक घरात बसण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्या वापरल्या जातात. प्लास्टिकची खुर्ची ही अतिशय टिकाऊ असल्याने ती ऊन, वारा, पाऊस या सर्व परिस्थितीत टिकून राहू शकते. परंतु काही कालावधीनंतर वापर करून करून या खुर्च्यांवर घाणीची थर बसू लागतो. ज्यामुळे या खुर्च्या काळ्या होतात आणि काही काळानंतर यावर बसणे नकोसे वाटते. तेव्हा अश्या खराब झालेल्या प्लास्टिक खुर्च्या साफ करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.

15

खुर्चीवर पडलेले डाग अनेकदा घट्ट असल्याने ते सहजासहजी निघत नाहीत. अशावेळी 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाका आणि त्यात 3 चमचे लिंबूचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि एका स्प्रे बॉटलने खुर्चीवर स्प्रे करा. यामुळे खुर्चीवर पडलेले घट्ट डाग आणि घाण नरम होईल आणि त्यांना साफ करणे सोपे जाईल.

25

खराब झालेल्या खुर्च्यांना साफ करण्यासाठी एक्स्पायर शॅम्पूचा देखील वापर करू शकता. एक्स्पायर झालेल्या शॅम्पूना तुम्ही खराब खुर्चीवर लावा. काहीवेळ त्यांना ब्रशने घासून काढा. यामुळे खुर्च्या चांगल्या साफ होतील.

35

यासाठी सर्वात आधी एका भांड्यात 3 ते 4 चमचे एक्स्पायर शॅम्पू घ्या. आता 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा टाकून मिक्स करा आणि मग त्यात 1 ते 2 लिटर पाणी टाकून नीट मिक्स करून घ्या.

45

हे मिश्रण खुर्च्यांवर लावून 5 मिनिट ठेवा आणि मग काहीवेळ त्यांना ब्रशने घासून काढा. यामुळे खुर्च्या चांगल्या साफ होतील.

55

प्लास्टिक खुर्च्यांना साफ करण्यासाठी तुम्ही घरातील इतरही वस्तूंचा वापर करू शकता. एक्सपायर शैम्पू , लिंबूचा रस, अमोनिया पावडर, ब्लिच पावडर देखील खुर्चीची स्वच्छता करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

  • FIRST PUBLISHED :