NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Vegetables For Monsoon : पावसाळ्यात नक्की खा या निवडक भाज्या, आजार राहतील दूर

Vegetables For Monsoon : पावसाळ्यात नक्की खा या निवडक भाज्या, आजार राहतील दूर

भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु पावसाळ्यात काही निवडक भाज्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात आणि या ऋतूत उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून बचाव होतो.

18

नेहमीच सांगिलते जाते पावसाळ्यात आपला आहार कसा असावा किंवा पावसाळ्यात काय खाऊ नये. मात्र पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी जशा काही भाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो त्याचप्रकारे या ऋतूत तुम्ही कोणत्या भाज्या खाव्या हेदेखील तितकेच महत्वचाहे आहे.

28

पावसाळ्यात खात असलेल्या भाज्यांबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात काही निवडक भाज्यांचेच सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात.

38

काकडी : मिश्री डॉट कॉमच्या मते, ही अशी फळभाजी आहे. जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पावसाळ्यातही काकडी प्रमाणात जरूर खावी. काकडी सॅलड किंवा सँडविचसाठी योग्य आणि आवश्यक पदार्थ आहे.

48

टोमॅटो : टोमॅटो ही प्रत्येक भारतीय भाजीमध्ये आवश्यक असणारा पदार्थ आहे. भाजी किंवा सूपमध्ये याचा भरपूर वापर केला जातो. पावसाळ्यात आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश नक्की करावा.

58

भेंडी : पावसाळ्यात भेंडी खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. याशिवाय भेंडी खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर राहतात. यामुळे हाडेही मजबूत राहतात.

68

दुधी भोपळा : पावसात भोपळा खाणे फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये भरपूर लोह, व्हिटॅमिन बी आणि सी असते, जे पावसात शरीराला संसर्गापासून वाचवते.

78

कारले : पावसाळ्यात कारले खाणे सर्वात फायदेशीर आहे. त्याचे फायदे अगणित आहेत, व्हिटॅमिन सीने समृद्ध कारले प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवते. यामध्ये असलेले अँटीव्हायरल गुणधर्म पावसामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करतात.

88

ढेमसे : ढेमश्यापासून अनेक प्रकारच्या भाज्या तयार करता येतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी शरीरातील जळजळ आणि जळजळ दूर करते. पावसाळ्यात ढेमसे खाणे फायदेशीर आहे.

  • FIRST PUBLISHED :