हाय ब्लड प्रेशर : एबीपी माझ्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाबाची काळजी न घेतल्यास अनेक जुनाट आजार होण्याचा धोका असतो. हाय ब्लड प्रेशर हृदयविकाराचे मुख्य कारण मानले जाते. या स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो.
कॅन्सर : कर्करोग हेदेखील सायलेंट किलर समजले जाते. याचे लवकर निदान न झाल्यास जीवही जाऊ शकतो. यामध्ये सर्वात जास्त कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे सायलेंट किलर्स असतात.
मधुमेह : शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या आरोग्य समस्या उद्भवतात. मात्र साखरेची पातळी वारंवार वाढत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. अन्यथा त्याचा किडनी आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
हाय कोलेस्टेरॉल : उच्च कोलेस्टेरॉल धोकादायक पातळीवर पोहोचेपर्यंत रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र तुम्ही वारंवार अस्वास्थ्यकर चरबीयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न खात असाल किंवा दारू, धूम्रपान या सवयी तुम्हाला असतील तर तुमचे हाय कोलेस्टेरॉल वाढायला सुरुवात होईल.
फॅटी लिव्हर : फॅटी लिव्हर या सायलेंट किलर म्हणतात. यामध्ये यकृतात चरबी वाढते. ही समस्या मद्यपान करणारे आणि न करणाऱ्या दोघांनाही होऊ शकते. काहीवेळा हा आजार यकृताच्या सिरोसिसचेही कारण बनू शकतो. त्यामुळे याच्या छोट्या छोट्या लक्षणाकडेहजी दुर्लक्ष करू नका.
इन्सोम्निया : झोप न येणे हा त्रास वाढला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. निद्रानाशाची समस्या अनेक जुनाट आजारांना जन्म देऊ शकते, असे अभ्यासात आढळून आले आहे. यामुळे स्लीप एपनियादेखील होऊ शकतो.