NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हिरवी मिरची आरोग्यासाठी ठरू शकते वरदान; फक्त जाणून घ्या खाण्याचे योग्य प्रमाण

हिरवी मिरची आरोग्यासाठी ठरू शकते वरदान; फक्त जाणून घ्या खाण्याचे योग्य प्रमाण

सगळ्यांना किंवा बहुतेकांना जेवणाची चव वाढवण्यासाठी मिरची हवी असते. काही लोकांना तर हिरव्या मिरचीचा ठेचा खायला प्रचंड आवडते. मात्र याचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात याची तुम्हाला कल्पना आहे?

18

लोक हिरवी मिरची चवीने खातात. परंतु अनेकांना हे माहीत नाही की हिरव्या मिरचीमध्ये आहारातील फायबर, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, लोह, मॅंगनीज आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.

28

त्यात जीवनसत्त्वे A, C, K, B6, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियम. त्यातील सर्व घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. हिरव्या मिरच्या खाण्याचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

38

कर्करोग दूर ठेवते : हिरव्या मिरचीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीरात जमा झालेले सर्व हानिकारक विषारी घटक काढून टाकतात. परिणामी कर्करोगाच्या पेशी नैसर्गिकरित्या जन्माला येण्याचा धोका कमी होतो.

48

हृदय निरोगी ठेवते : हिरवी मिरची रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तसेच रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत याचीही काळजी घेते. त्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

58

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत होते की कोणतेही व्हायरस बॅक्टरीया शरीराला हानी पोहोचवू शकत नाहीत.

68

मधुमेह दूर ठेवते : हिरव्या मिरचीतील विविध फायदेशीर घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष भूमिका बजावतात. त्यामुळे साहजिकच मधुमेहासारख्या आजारांना जवळ येण्याची संधी मिळत नाही.

78

मात्र हिरव्या मिरचीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. अन्यथा यामुळे अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळ होणं, पोट फुगणं, शरीरातली विषद्रव्यं वाढू शकतात. रोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त हिरव्या मिरच्या खाल्याने डिमेन्शियासारखी स्थिती उद्भवू शकते.

88

हिरवी मिरची ही फायदेशीर असली, तरी ती रोगावर इलाज नव्हे. त्यामुळे ती मर्यादित प्रमाणात आहारात असावी. रोज केवळ दोन हिरव्या मिरच्या खाणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

  • FIRST PUBLISHED :