NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Ginger For Skin : आल्याचा एक तुकडा दूर करू शकतो पिंपल्स आणि रिंकल्स, असा करा वापर

Ginger For Skin : आल्याचा एक तुकडा दूर करू शकतो पिंपल्स आणि रिंकल्स, असा करा वापर

अनेकांना आश्चर्य वाटेल की आपल्या त्वचेसाठी आल्याचा उपयोग कसा होऊ शकतो. आल्याचा चहा, आल्याची कॉफी आपण घेतो. मात्र याला त्वचेवर लावण्याचे फायदे अनेकांना माहीत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया आल्याचे त्वचेसाठी फायदे.

19

आल्याचा रस मुरुमांपासून बचाव करणाऱ्या घटकांपैकी एक आहे. आल्यामध्ये मजबूत अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

29

चेहऱ्यावरील मुरुमांवर उपचार करण्यासाठी आले वापरता येते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि मुरुमांपासून पूर्णपणे मुक्त होण्यास मदत होते. मुरुमांमुळे डाग येत असतील तर आले त्यावरही फायदेशीर ठरते.

39

मुरुमांची समस्या असलेल्या लोकांनी आल्याचा रस चेहऱ्यावर लावा. आल्यामुळे चेहऱ्यावर इरिटेशन किंवा जास्त जळजळ होत असेल तर आल्याचा रसात गुलाब जल मिसळून लावावे.

49

काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि कमी वयातच त्वचा वृद्ध दिसू शकते. आल्याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा म्हणजेच सुरकुत्या टाळता येतात.

59

आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. आले रक्त प्रवाह उत्तेजित करते आणि त्वचेला पोषक द्रव्ये मिळवण्यास मदत करते, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचा तरूण दिसते.

69

तुम्ही आल्याचा फेस पकवापरू शकता. आले सोलून त्याचे छोटे तुकडे करा आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात मिल्क पावडर किंवा चंदन पावडर घालून मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे सोडा. नंतर ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

79

आले एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये टोनिंग गुणधर्म आहेत. आले सोलून खोबर्‍याप्रमाणे किसून घ्या. किसलेले आले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आवश्यक असल्यास मध, चंदन पावडर घाला आणि फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हे चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

89

आले गुलाबपाणी आणि मधात मिसळून लावल्याने त्वचेला फायदा होतो. याची पेस्ट करून त्वचेवर लावा. त्यानंतर 20-25 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. या औषधी गुणांनी त्वचेच्या समस्या दूर होतील.

99

आले, मध आणि लिंबाचा रस मिसळून लावल्यानेही त्वचेला फायदा होतो. ही पेस्ट त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते आणि चेहऱ्यावरील डागही दूर करते.

  • FIRST PUBLISHED :