NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / First Rain : पहिल्या पावसात भिजणं योग्य की अयोग्य, याने खरंच घामोळ्या नाहीशा होतात?

First Rain : पहिल्या पावसात भिजणं योग्य की अयोग्य, याने खरंच घामोळ्या नाहीशा होतात?

हंगामातील पहिल्या पावसात भिजायला अनेकांना आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतात. मात्र, त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे होणाऱ्या त्रासांकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत.

18

पावसाळ्यात हवामानात बदल होणे हे सामान्य आहे. कधी कधी अचानक पाऊस पडतो आणि वातावरण थंड होते. कधी कधी आर्द्रता आणि उन्हामुळे उष्णतेत वाढ होते. या दरम्यान पावसात भिजणेदेखील आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकते.

28

पावसात भिजल्यानंतर शरीर आणि बाहेरील उष्णता मॅच न झाल्यामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू होतो. पहिल्या पावसात उकाडा खूप वाढल्यानंतर सांयकाळच्या सुमारास पाऊस येतो. त्यात अचानक आपण भिजल्याने आपले शरीर आतून गरम असताना ते बाहेरून थंड होते आणि आपण आजारी पडू शकतो.

38

पहिल्या पावसात हवेत असलेली धूळ थेंबाबरोबर खाली येते. हवेतील प्रदूषण या पावसात आपल्या केसांचे आरोग्य बिघडवू शकते. यामुळे केसात खाज सुटणे, कोंडा होण्याचा त्रास वाढू शकतो.

48

पहिला पाऊस पडण्यापूर्वी हवामान खूप गरम असते. जवळपास 40 अंश सेल्सियस असलेले तापमान पाऊस पडताना अचानक 20 अंशावर येते. त्यामुळे या पावसात भिजल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो.

58

पहिल्या पावसातील खराब पाण्यामुळे आपल्याला स्कीनचे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. हवेतील प्रदूषित घटकांमुळे आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. अनेकांना पहिल्या पावसात भिजल्यानंतर स्कीन प्रॉब्लेम सुरू झाल्याचे दिसून येते.

68

त्यामुळे पहिल्या पावसात भिजल्यामुळे घामोळ्या नाहीशा होतात, हे ठामपणे सांगता येत नाही. याच कारणामुळे अनेकांना इच्छा असूनही पावसाचा आनंद घेता येत नाही. मात्र ही सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवू शकता.

78

पावसामुळे भिजल्यानंतर लगेच अंग पुसून कोरडे करा, ओले कपडे त्वरित बदला, गरम चहा प्या, भिजल्यानंतर लगेच पाय पुसून कोरडे करा आणि त्यावर आवश्यक क्रीम लावा.

88

पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे दाद, खरुज, खाज सुटणे यांसारख्या त्वचेचे संसर्ग होऊ शकता. अशा परिस्थितीत अँटी-बॅक्टेरियल क्रीमची मदत घ्या. अँटी-बॅक्टेरियल क्रीम शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

  • FIRST PUBLISHED :