NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मुंबईच्या 'गेट वे' पासून उत्तरेच्या 'चारधामां'पर्यंत... ऱाजधानीत 'भारत दर्शन पार्क'मध्ये दिसतील देशातली 21 वैशिष्ट्यपूर्ण स्थळं

मुंबईच्या 'गेट वे' पासून उत्तरेच्या 'चारधामां'पर्यंत... ऱाजधानीत 'भारत दर्शन पार्क'मध्ये दिसतील देशातली 21 वैशिष्ट्यपूर्ण स्थळं

देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि दैदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या 21 स्मारकांच्या प्रतिकृती एकाच ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. दिल्लीचं हे भव्य 'भारत दर्शन पार्क' लवकरच खुलं होणार आहे. पाहा एक झलक

113

देशाचे 21 स्मारकांच्या प्रतिकृती असलेले दिल्लीचे 'भारत दर्शन पार्क' ऑक्टोबरपर्यंत खुले होईल.

213

तयार होत असलेल्या या पार्कमध्ये मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाची अशी प्रतिकृती असेल.

313

या पार्कमध्ये बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी आणि द्वारका येथील चार धाम मंदिरांच्या प्रतिकृती देखील असणार आहे. (Image: Shutterstock)

413

हैदराबादेतील प्रसिद्ध चारमिनारचीदेखील प्रतिकृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल. 8.5 एकरमध्ये पसरलेले हे 'भारत दर्शन पार्क' पार्क दिल्ली महानगरपालिकेने विकसित केले आहे. (Image: Shutterstock)

513

महाराष्ट्रातील अजिंठा आणि एलोरा लेण्यांचीही प्रतिकृती असणारे हे पार्क 14 कोटी खर्च करून विकसित करण्यात येत आहे. (Image: Shutterstock)

613

भारत दर्शन पार्कमध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध गोल घुमटचीही प्रतिकृती असेल. त्यामुळे पर्यटकांना या पार्कची उत्सुकता लागली आहे. (Image: Shutterstock)

713

या सर्व प्रतिकृती रॉड आणि वाहनांच्या स्टीलच्या रिम्ससारख्या लोखंडापासून बनवल्या जातील. (Image: Shutterstock)

813

या उद्यानात राजस्थानच्या जुनागढ किल्ल्याच्या प्रतिकृतींचा समावेश असेल. ज्यामुळे पर्यटकांना राजस्थानच्या संस्कृतीचीही माहिती होईल. (Image: Shutterstock)

913

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिराची प्रतिकृतीही 'भारत दर्शन पार्क' मध्ये उद्यानात पहायला मिळेल. (Image: Shutterstock)

1013

कोणार्क मंदिराची प्रतिकृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. (Image: Shutterstock)

1113

म्हैसूर पॅलेस पार्कमधील प्रतिकृतींपैकी एक असेल. रंगीबेरंगी दिव्यांच्या साहाय्याने प्रतिकृती चमकवल्या जाणार आहेत. (Image: Shutterstock)

1213

या पार्कमध्ये हंपी आणि नालंदाच्या अवशेषांची प्रतिकृतीही असेल. वॉकिंग ट्रॅकचे बांधकाम आणि वृक्षारोपणाचे काम बाजूला ठेवून बहुतेक मोठे बांधकाम काम पूर्ण झाले आहे. (Image: Shutterstock)

1313

'भारत दर्शन पार्क' मध्ये सांचीच्या स्तुपाची प्रतिकृतीही बसवली जाईल. उद्यानात 110 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा यंत्र ही बसवले जाणार आहेत. (Image: Shutterstock)

  • FIRST PUBLISHED :