NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 'मंगळसूत्र' घालण्याची प्रथा कशी सुरु झाली?

'मंगळसूत्र' घालण्याची प्रथा कशी सुरु झाली?

मंगळसुत्राशिवाय लग्न मान्य होत नाही, असं आपल्याकडे मानलं जातं. पण कधी विचार केलाय का की मंगळसूत्र हा प्रकार आला कुठून?

16

मंगळसुत्रा शिवाय लग्न मान्य होत नाही असं आपल्याकडे मानलं जातं. पण कधी विचार केलाय का की मंगळसूत्र हा प्रकार आला कुठून? त्याचा इतिहास काय किंवा कोणी आणि कधी पासून हे घालायला सुरुवात झाल? सौभाग्यवतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या या मंगळसुत्राबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

26

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये मंगळसुत्र हा अलंकार विशेष प्रचलित आहे. विवाहित स्त्रीया ते आवर्जून घालतात. अगदी 'साधे मंगळसूत्र' म्हणजे दोऱ्यात ओवलेली काचेच्या काळ्या मण्यांची दोन पदरी माळ होय. माळेच्या मध्यभागी बहुधा सोन्याचे चार गोल मणी व सोन्याच्या दोन लहान वाट्या बसवलेल्या असतात.

36

तामिळनाडू व केरळ या प्रदेशात 'ताळी' नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याची प्रथा आहे. त्यावरूनच 'मंगळसूत्र' बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी.

46

लग्नाच्या वेळी नवरा मुलगा हा दागिना वधूच्या गळ्यात घालतो आणि त्यानंतर पत्नी झालेली वधू आयुष्यभर ते गळ्यात ठेवते. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचे 'स्त्रीधन' असते. ते तिच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.

56

काही अभ्यासकांच्या मते दक्षिण भारतातून हा अलंकार महाराष्ट्रात आला असावा. त्यामध्ये भौमितिक आकृतिबंध तसेच आंबा, नारळ, कोयरी इ.फळांच्या आकाराचे डिझाइन्सचा समावेश तसेच काळे मणी असतात.

66

काही ठिकाणी काळी पोत वाखाच्या दोऱ्यात, काळ्या गोफात किंवा सोन्याच्या तारेत गुंफून 'मंगळसूत्र' तयार करण्याची प्रथा आहे. मंगळसूत्रालाच 'गाठले', 'डोरले', 'गुंठण' असेही शब्द ग्रामीण भागात रूढ आहेत. पूर्वी 'डोरले' हे मराठी विवाहित स्त्रीचे धन मानले जात असे. डोरले हे सोन्यापासून बनवले जाते.

  • FIRST PUBLISHED :