NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Friendship Day 2022 : या राशीचा मित्र बनेल तुमचा बेस्टी? आयुष्यभर सुखदुःखात देईल साथ

Friendship Day 2022 : या राशीचा मित्र बनेल तुमचा बेस्टी? आयुष्यभर सुखदुःखात देईल साथ

चांगला मित्र प्रत्येकाच्याच नशीबात असतो असं नाही. आयुष्यातील बऱ्याच ठिकाणी मित्रमैत्रिणींची गरज भासते आणि अशावेळी साथ देणारे मित्रमैत्रिणी क्वचितच असतात. पण जसा आयुष्याचा जोडीदार राशी पाहून निवडतो, तसंच मित्रमैत्रिणीही राशी पाहून निवडल्याच त्यांची साथही आयुष्यभर लाभेल.

110

चांगला मित्र प्रत्येकाच्याच नशीबात असतो असं नाही. आयुष्यातील बऱ्याच ठिकाणी मित्रमैत्रिणींची गरज भासते आणि अशावेळी साथ देणारे मित्रमैत्रिणी क्वचितच असतात. पण जसा आयुष्याचा जोडीदार राशी पाहून निवडतो, तसंच मित्रमैत्रिणीही राशी पाहून निवडल्याच त्यांची साथही आयुष्यभर लाभेल.

210

मैत्री करताना फक्त स्वभाव नाही तर त्या व्यक्तीची रासही पाहा. राशीनुसार मैत्री केल्यास ही मैत्री कायम टिकेल. आपण ज्याच्याशी मैत्री केली आहे, तो किंवा ती तुमच्या मैत्रीसाठी योग्य आहे की नाही हे तुम्ही तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या राशीनुसार ठरवू शकता.

310

मेष आणि तूळ : मेष राशीचे लोक अतिशय डायनामिक, मजेदार, भावनिक, उर्जेने भरलेले आणि आत्मविश्वासी असतात. तर तूळ राशीचे लोक खूप संतुलित आणि शांत जीवन जगतात. अशा लोकांसाठी तूळ राशीचा मित्र एक परिपूर्ण निवड असू शकते.

410

वृषभ आणि कन्या : वृषभ राशीचे लोक मित्रांबद्दल खूप निवडक असतात. अशा लोकांना त्यांची मैत्री खूप विश्वास असलेली आणि एकमेकांना आनंदी ठेवणारी असावी असे वाटते. कन्या राशीचे लोक अशा लोकांसाठी उत्तम मित्र असू शकतात.

510

मिथुन आणि तूळ : या दोघांमधील मैत्री ही एक अतिशय आदर्श मैत्रीही होऊ शकते. तूळ राशीचे लोक आनंदाने मुक्तपणे जगण्यात विश्वास ठेवतात, तर मिथुन राशीचे लोक आपल्या प्रिय तूळ मित्राला इंटेलॅक्युअल पद्धतीने जगण्यासाठी मदत करतात. यामुळे दोघांची मैत्री संस्मरणीय होऊ शकते.

610

कर्क आणि मीन : कर्क आणि मीन यांच्यातही घट्ट मैत्री असते. कर्क राशीचे लोक त्यांच्या मैत्रीबद्दल खूप भावूक असतात आणि सहज मैत्री करतात. तर मीन राशीचे लोक आकर्षक आणि आदर्शवादी असतात. या दोघांची मैत्री कालांतराने अधिक घट्ट होत जाते.

710

सिंह आणि कुंभ : सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक, सर्जनशील आणि मजेदार असते. अशा लोकांना स्वतःसारख्या लोकांशी मैत्री करायला आवडते. त्यामुळे कुंभ राशीशी मैत्री यांच्यासाठी खूप मजेदार आणि पर्सनल असते.

810

कन्या आणि वृश्चिक : तुम्ही कन्या राशीचे असाल तर वृश्चिक राशीच्या लोकांसोबत तुमची चांगली मैत्री होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना सखोल चर्चा करण्यात आणि बौद्धिक बाबींमध्ये रस असतो. त्यामुळे तुम्हाला या विषयांवर दीर्घ चर्चा करायला आवडणारी मैत्री हवी.

910

तूळ आणि कुंभ : तूळ आणि कुंभ राशीची मैत्रीही घट्ट असते आणि ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. या दोघांमधील परस्पर समज खूप चांगले असतात आणि त्यांना सर्व गॉसिप किंवा गोष्टी एकमेकांमध्ये शेअर करायला आवडतात.

1010

त्याचबरोबर वृश्चिक आणि मकर, धनु आणि धनु, मकर आणि कुंभ, कुंभ आणि मीन, मीन आणि वृश्चिक यांची मैत्रीही घट्ट असते.

  • FIRST PUBLISHED :