NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / बांबूचं लोणचं, कधी ऐकलंय? देशाच्या या कोपऱ्यात आहे ही फेमस डिश, अशी आहे रेसिपी!

बांबूचं लोणचं, कधी ऐकलंय? देशाच्या या कोपऱ्यात आहे ही फेमस डिश, अशी आहे रेसिपी!

खोरिसा म्हणजेच येथील एक प्रसिद्ध पदार्थ आहे, त्याबाबत जाणून घेणार आहोत. खरंतर हे एक लोणचं आहे, ज्याला इंग्रजीत बांबू शूट म्हणतात.

15

बांबूच्या कोंबांपासून बनवलेलं हे लोणचं आशियातील विविध देशांमध्ये अतिशय चवीने खाल्लं जातं. परंतु वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आसामच्या मैदानी भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रमुख आहारात त्याचा समावेश होतो. या लोणच्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, असं मानलं जातं.

25

बांबूला साधारण श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात कोंब येतात. या कोंबांपासून खोरिसा बनवला जातो. हे लोणचं बनवण्यासाठी बाबूंच्या वरील मऊ भाग कापून त्याचे लहान-लहान तुकडे एका भांड्यात झाकून ठेवले जातात. या अंकुराची साल काळजीपूर्वक सोलली नाही तर ती ओली होते. बाबूंचे हे तुकडे केळीच्या पानात गुंडाळून चार ते पाच दिवस चुलीजवळ ठेवले जातात. मग भांड्यात किंवा बांबूच्या कोंबांनी भरलेली बाटली उन्हात ठेवली जाते.

35

काही लोक यात पाणी आणि चवीनुसार विविध पदार्थ घालतात. आंबट लोणचं तर अनेकांना आवडतं, जेव्हा या मिश्रणाचा सुगंध येऊ लागतो तेव्हा ते तयार झालंय असं मानलं जातं. अनेकजण यात हळदही घालतात. कोरडं झाल्यानंतर हे मिश्रण गोठतं. त्याला 'कोरडा खोरिसा' म्हणतात.

45

वाळलेल्या खोरिसाचा लोक वर्षभर वापर करतात. आसाममध्ये उन्हाळ्यात कोंब सुकवून त्यात डाळी मिसळून खाण्याची परंपरा आहे.

55

भाजीपाला, मासे, अंडी, मांस इत्यादींमध्ये खोरिसा घालून विविध पदार्थ तयार केले जातात. कच्चा खोरिसा चटणी म्हणून मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांसोबत खाल्ला जातो.

  • FIRST PUBLISHED :