भारतामध्ये तांदळाकडे मुख्य अन्न म्हणून पाहिलं जातं, भारतीयांच्या आहारात मोठ्या प्रमाणात तांदळाचा वापर होतो.
2) मात्र सध्या बाजारात प्लास्टिकचे तांदूळ देखील आले आहेत. अशा प्रकारचे पांढरेशुभ्र आणि कृत्रिम चमक असलेले हे तांदूळ अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतात.
अशा प्रकारचे तांदूळ अनेकदा बासमती तांदूळ म्हणून बाजारात विकले जातात. या तांदळातील फरक लवकर कळून येत नाही. मात्र आपण आज यातील फरक कसा ओळखावा हे जाणून घेणार आहोत.
चित्रकूटचे कृषीतज्ज्ञ राम प्रकाश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार बासमती तांदळाचा दाणा हा लांब असतो. जेव्हा भात शिजवला जातो तेव्हा हे दाणे एकोंमेकांना न चिटकता भात तयार होतो. तसेच या भातामधून एक प्रकारचा सुंगध येतो. या सुंगाधामुळे बासमती तांदळाची ओळख होते.
बासमती तांदूळ आणि खोटे तांदळू यांच्यामधील फरक लक्षात घेण्यासाठी तांदळाचे काही दाणे एका चमच्यामध्ये घ्या आणि ते पाण्यानं भरलेल्या वाटीमध्ये टाका. जर तांदळाचे दाणे खाली जावून बसले तर तो ओरिजनल तांदूळ आहे असे समजावे. जर ते दाणे वर तरंगले तर ते प्लॅस्टिक आहे असे समजावे. कारण प्लॅस्टिक पाण्यामध्ये बुडत नाही.
राम प्रकाश द्विवेदी यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, एका तव्यावर थोडा तांदूळ घ्या तो गरम करा ते दाणे जर एकोमेंकांना चिकटले तर समजून जा की हा प्लॅस्टिकचा तांदूळ आहे, कारण प्लॉस्टिक उष्णतेमुळे वितळतं. ते दाणे जर चिकटले नाहीत तर तो बासमती तांदूळ आहे असे समजावे.
भारतीय उपखंडात बासमती तांदूळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं.