रक्तवाहिन्या आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात रक्त, ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये वाहून नेतात. मात्र वाढत्या वयासोबत या रक्तवाहिन्यादेखील कमकुवत होऊ लागतात. अशावेळी काही पदार्थ या रक्तवाहिन्या स्ट्रॉन्ग बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात. विशेषत: अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडेंट, जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी कार्य करते. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये अँथोसायनिनचे प्रमाण खूप जास्त असते.
अॅव्होकाडो मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा उत्कृष्ट स्त्रोत असतात, जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
संपूर्ण धान्य फायबरने समृद्ध असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन बीदेखील आढळते, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होत नाही. यासाठी तुम्ही तपकिरी तांदूळ, क्विनोआ, गव्हाचा ब्रेड हे पदार्थही खाऊ शकता.
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि शरीरात रक्ताभिसरण वाढवतात.
हळदीचा उपयोग प्राचीन काळापासून उपचारासाठी केला जातो. हळदीचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या आकसत नाहीत आणि रक्ताभिसरणही योग्य राहते.
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सीदेखील असते, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होण्यास प्रतिबंध होतो.
पालक, केल यांसारख्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रेट्स असतात, जे रक्त प्रवाह सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.