NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Food Causing Sleeplessness : या पदार्थांमुळे झोपेचं खोबरं होतं; रात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका

Food Causing Sleeplessness : या पदार्थांमुळे झोपेचं खोबरं होतं; रात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका

प्रत्येक व्यक्तीला जितकी योग्य आहाराची गरज असते तितकीच योग्य प्रमाणात झोपेची गरज असते. मात्र काही पदार्थ तुमच्या झोपेवर खु[प परिणाम करतात. यामुळे तुमची झोप हळूहळू कमी होते.

17

काही पदार्थ त्यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्या झोपेवर परिणाम करतात. असे [पदार्थ खाल्ल्याने हळूहळू आपली झोप कमी होऊ लागते. पाहूया कोणते आहेत हे पदार्थ.

27

मसालेदार पदार्थ : झोपण्यापूर्वी मसालेदार अन्न खाल्ल्याने निद्रानाशाची समस्या निर्माण होऊ शकते. मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटात आम्ल तयार होऊ शकते आणि काहीवेळा अपचन, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठता होऊ शकते, ज्यामुळे झोप विस्कळीत होते.

37

एनर्जी ड्रिंक्स : झोपायच्या आधी एरेटेड ड्रिंक्स प्यायल्याने झोपेवर परिणाम होतो. कारण हे तहान शमवणारे पेय कॅफिन आणि साखरेने भरलेले असते, जे त्वरित ऊर्जा पातळी वाढवते आणि झोपेमध्ये हळूहळू व्यत्यय आणते.

47

फॅट्स असलेले पदार्थ : E Times ने दिलेल्या माहितीनुसार, एका अभ्यासात असे आढळले आहे की, आहारात सॅच्युरेटेड फॅट्सचे जास्त सेवन केल्याने निद्रानाश होऊ शकतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.

57

कॅफिन : कॉफी, चहामध्ये कॅफीनचे अतिसेवन केल्याने मेंदूच्या एडेनोसिनच्या रिसेप्टर्सवर परिणाम होऊ शकतो, जे मुळात झोपेला प्रोत्साहन देणारे रसायन आहे. कॅफिन सतर्कता वाढवते आणि हे निद्रानाशाचे एक प्रमुख ट्रिगर असू शकते.

67

आंबवलेले पदार्थ : रेड वाईन, लोणचे यांसारखे आंबवलेले पदार्थदेखील झोपेची गुणवत्ता आणि पत्तारण बिघडवू शकतात.

77

अल्कोहोल : एखाद्यादिवशी अल्कोहोलमुले तुम्हाला शांत झोप नक्की लागते. पण कालांतराने अल्कोहोल तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि चिंता पातळीमध्ये व्यत्यय आणू शकते.

  • FIRST PUBLISHED :