NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Diwali Cleaning Tips : ग्रीन दिवाळीची साफसफाईपासूनच करा सुरुवात; अशी करा घराची इकोफ्रेंडली स्वच्छता

Diwali Cleaning Tips : ग्रीन दिवाळीची साफसफाईपासूनच करा सुरुवात; अशी करा घराची इकोफ्रेंडली स्वच्छता

दिवाळीची साफसफाई आता सगळीकडे सुरु झाली असेल. घराची स्वच्छता करण्यासाठी काही इकोफ्रेंडली पद्धती वापरून आपण निसर्गाचीही हानी रोखू शकतो. पाहा काय आहे पर्याय.

16

घरातील साफसफाईची करण्यासाठी आपण रसायनयुक्त क्लीनर आणि प्लॅस्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू वापरतो. मात्र त्याऐवजी घरातील पदार्थ आणि बायोडिग्रीडेबल वस्तू वापरल्यास पर्यावरचेही नुकसान होणार नाही.

26

नैसर्गिक क्लीनर : Femina मध्ये दिलेल्या माहितीनुसार, लिंबूवर्गीय फळाची साल, ब्राऊन शुगर किंवा गूळ, यीस्ट आणि पाणी यांचे मिश्रण बनवा आणि महिनाभर ते तसेच राहू द्या. त्यानंतर ते गाळून स्वच्छतेसाठी वापरू शकता.

36

नैसर्गिक क्लीनर : स्टीलच्या पृष्ठभागावरील घाण काढण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये काही लिंबाचे थेंब मिसळा आणि त्याने स्क्रब करा. रसायन न वापरल्याने निसरगाचेही नुकसान टळेल आणि तुमच्या हातालाही त्रास होणार नाही.

46

कापडी डस्टर : पेपर टिश्यू किंवा नॅपकिन्स वापरण्याऐवजी कापडाचे डस्टर वापरा. हे दीर्घ काळ टिकेल आणि तुम्हाला वारंवार कागदाचे टिश्यू खरेदी कारवाई लागणार नाहीत.

56

कॉयर स्क्रब : रासायनिक आणि प्लास्टिकने भरलेले सिंथेटिक स्क्रब वापरण्याऐवजी नारळाच्या सालीपासून बनवले गेलेले कॉयर स्क्रब वापरा. हे पर्यावरणास आणि तुमच्या हातांसाठीही अनुकूल आहे.

66

डी-क्लटरिंग : घरातील नको असलेल्या वस्तू काढून टाकणे हा दिवाळीच्या स्वच्छतेतील खूप महत्वाचा भाग आहे. मात्र या वस्तू काढून फेकून देण्यापेक्षा त्या एखाद्या NGO ला द्या. जेणेकरून ते त्याचा योग्य वापर करतील.

  • FIRST PUBLISHED :