NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / डायबिटीज ते सांधेदुखीपर्यंत अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे काळी हळद, वाचा फायदे

डायबिटीज ते सांधेदुखीपर्यंत अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे काळी हळद, वाचा फायदे

पिवळी हळद सर्वांनाच माहीत आहे. पण काळ्या हळदीबद्दल फारशी लोकांना माहिती नाही. काळी हळद आलं कुटुंबातील एक सदस्य आहे आणि ती बहुतेकवेळा वैद्यकीय कारणांसाठी वापरले जाते.

19

काळी हळद ही एक दुर्मिळ औषधी वनस्पती आहे. यामध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण सर्वाधिक असते. आणि हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी एजंट देखील आहे. काळी हळद अनेक आरोग्यदायी फायदे देते.

29

वेदना कमी करते : काळी हळद एक उत्तम वेदनाशामक म्हणून ओळखली जाते. काळ्या हळदीचा उपयोग दातदुखी, पुरळ, पोटाच्या समस्या आणि ऑस्टियोआर्थरायटिससाठी केला जातो. परंतु याचे सेवन नेहमी प्रमाणात करावे.

39

शुगर नियंत्रित करते : काळी हळद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे शरीरात पित्त उत्पादन राखते आणि योग्य पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्याचा धोका कमी होतो.

49

अँटिऑक्सिडंट : काळी हळददेखील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे, जी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.

59

फुफ्फुसाचा विकार : काळ्या हळदीमध्ये असलेले कर्क्युमा सेसिया फुफ्फुसांना मजबूत करते आणि ब्राँकायटिस, न्यूमोनिया, दमा इत्यादी रोग बरे करते.

69

जखमा लवकर बऱ्या करते : झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ काप, दुखापती झालेल्या भागावर काळ्या हळदीची पेस्ट लावल्यास जखमा लवकर बऱ्या होतात.

79

पचन चांगले होते : काळी हळद पोटाच्या समस्या, पचन सुधारण्याचे काम करते. जर कोणाला पोटदुखी किंवा गॅसची समस्या असेल तर यासाठी काळी हळद पावडर तयार करून पाण्यात मिसळून प्या.

89

त्वचेसाठी फायदेशीर : पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळदही त्वचेसाठी फायदेशीर आहे. या हळदीमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास ग्लो येतो, काळे डाग आणि पिंपल्सपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.

99

सांधेदुखीत आराम : वाढत्या वयाबरोबर सांधेदुखी होणे सामान्य आहे. वेदना वाढू लागल्यावर अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध काळ्या हळदीची पेस्ट प्रभावित भागात लावा, सूजमध्येही आराम मिळेल.

  • FIRST PUBLISHED :