NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Drugs Party : या देशांमध्ये ड्रग्ज घेताना पोलिसांनी पकडलं तर छाटलं जातं मुंडकं

Drugs Party : या देशांमध्ये ड्रग्ज घेताना पोलिसांनी पकडलं तर छाटलं जातं मुंडकं

मुंबईत एका क्रूझ पार्टी दरम्यान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan drugs) आणि इतर काही सेलेब्रिटीजना पकडलं. ड्रग्ज (Bollywood Drug racket) घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. परंतु जगात असाही एक देश आहे जिथं narcotics कायदे इतके कडक आहेत की, ड्रग्ज घेताना पकडलं तर थेट होते देहदंडाची शिक्षा पाहा Photos

17

Bollywood Drug racket पुन्हा एकदा चर्चेत आहे. या वेळी क्रूझ पार्टीतून अटक करण्यात आलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान हे कारण आहे. जगातील काही देशांमध्ये ड्रग्ज घेण्याविरुद्ध अतिशय कठोर कायदे करण्यात आलेले आहेत. अशा ठिकाणी नशा करणं म्हणजे आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे. माहीत आहेत का हे देश?

27

मलेशियात ड्रग्ज पुरवणाऱ्याला, विक्रेत्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. कोणी ड्रग्जसह आढळलं तर त्याला तुरुंगवास किंवा दंडासह देशातून हद्दपार केलं जाऊ शकतं.

37

इराणमध्ये ड्रग्सशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कडक नियम आहेत. कारण या देशात सर्वात मोठी समस्या अफूच्या वापराशी संबंधित आहे. अफूचं उत्पादन हे इराणचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यामुळे जर इराणमध्ये कोणी ड्रग्जसह पकडलं गेलं तर त्याला मोठा दंड ठोठावला जातो.

47

प्रसिद्ध हुकूमशहा किम जोंग उनचा देश उत्तर कोरियामध्ये ड्रग्ज घेण्यास सक्त मनाई आहे. ड्रग्ज घेताना कुणी आढळलं तर त्याला बराच काळ छळ छावणीत किंवा कैदेत ठेवले जातं.

57

चीनमध्ये जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर त्याला सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं जातं. ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये फाशीचीही तरतूद आहे.

67

तुर्कस्तानात ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर मोठा दंड आणि जास्त काळ तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

77

मादक पदार्थ सेवनाच्या पदार्थासंबंधीत गुन्हे हे व्हिएतनाममध्ये गंभीरपणे हाताळले जातात. 1.3 पाऊंडपेक्षा जास्त हेरॉईनसह पकडलेल्या कोणत्याही आरोपीला त्या देशात फाशी दिली जाते.

  • FIRST PUBLISHED :