आयुर्वेदानुसार, कढीपत्त्याचा उपयोग अॅनिमिया, मधुमेह, अपचन, लठ्ठपणा, किडनी समस्या, केस आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याचे चमत्कारिक फायदे.
कढीपत्ता शरीराला अत्यावश्यक जीवनसत्त्व ए आणि सी प्रदान करते. आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. याचे सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो.
रक्तातील साखरेचे नियंत्रण : कढीपत्त्यातील औषधी गुणधर्म अशक्तपणाचा धोका कमी करण्यास मदत करतात. कढीपत्त्यातील फायबर इंसुलिनवर प्रभाव टाकून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.
शरीराचे वजन नियंत्रण : तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्यापोटी कढीपत्त्याची पाने चावून खा. कढीपत्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि अशाप्रकारे खाल्ल्यास याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.
मेंदूसाठी फायदे : हेल्थलाइनच्या अहवालानुसार, कढीपत्त्यात असे पदार्थ असतात जे मेंदूसह मज्जासंस्थेचे आरोग्य राखण्यास मदत करतात. कढीपत्त्यासोबत त्याचे तेलही फायदेशीर आहे. त्यात अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे अनेक संक्रमण टाळण्यास मदत करतात.
त्वचेचे आरोग्य : कढीपत्ता त्वचेसाठी देखील चांगला आहे. ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्याने बुरशीजन्य संसर्गाची समस्या दूर होते.
पचन सुधारणे : कढीपत्त्यात भरपूर फायबर आढळते, जे पचन चांगले ठेवण्यासाठी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. चक्कर येणे, उलट्या होणे, जुलाब होणे आदी तक्रारी याच्या सेवनाने कमी होतात.
डोळ्यांसाठी चांगले : एबीपी माझ्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, दृष्टी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. कढीपत्त्यात व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या सेवनाने मोतीबिंदूमध्ये आराम मिळतो.
लिव्हर फायदेशीर : एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कढीपत्ता खाल्ल्याने लिव्हर कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर राहू शकते. हे लिव्हरतील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी लिव्हर निरोगी ठेवण्याचे काम करतात.
सर्दी, खोकला दूर करते : सर्दी, खोकला असल्यासही कढीपत्ता फायद्याचा ठरतो. हे छातीत गोठलेला कफ बाहेर काढण्याचे काम करते. त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि ए च्या कंपाऊंड कॅम्पफेरॉलमध्ये दाहक-विरोधी तत्व असते. हे छातीला आराम देण्याचे काम करते.