द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.
तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही.
जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावरच प्रेम करत नाही, त्याला एकही संकट येत नाही.
जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.
आरोग्याशिवाय जगणं, जगणं नाही. ती फक्त वेदनांची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे.
तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा बडेजाव करू नका. इतरांचा मत्सर करू नका.
वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो.
जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जगू शकत नाही.
भौतिक आकर्षण डोळ्यांना आकर्षित करते, चांगुलपणा मनाला आकर्षित करतो.
आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे.