NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Brown Sugar Benefits : पांढऱ्या साखरेपेक्षा खरंच फायदेशीर असते का ब्राऊन शुगर?

Brown Sugar Benefits : पांढऱ्या साखरेपेक्षा खरंच फायदेशीर असते का ब्राऊन शुगर?

ब्राऊन ब्रेड खाण्याचे फायदे तर अनेक आहेत. मात्र बऱ्याच जणांना ब्राउन शुगरचे फायदे माहित नाहीत. लोकांना वाटते साखर ही साखर असते. मग ती पांढरी असो की ब्राऊन याने काय फरक पडतो. मात्र ब्राऊन शुगर तुमच्यासाठी खूप फायदेशीर असते. जाणून घेऊया कशी.

18

ब्राऊन शुगर उसाच्या रसातून मोलॅसिस काढून तयार केली जाते. पांढरी साखर त्या रंगात आणण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात. पण ब्राऊन शुगर नैसर्गिक रंग आणि सुगंधाने येत असल्याने आपल्याला त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील पूर्ण मिळतात.

28

ब्राऊन शुगर मासिक पाळीच्या वेदनांवर उपचार करण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि त्वचेचे हायड्रेशन वाढविण्यात मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊया ब्राऊन शुगरचे काही महत्त्वाचे फायदे...

38

बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीत खूप वेदना होतात. ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम असते, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी प्राचीन औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. यासाठी ब्राऊन शुगर मिसळून आल्याचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.

48

ब्राऊन शुगरमध्ये व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि पॅन्टोथेनिक ऍसिडसारखे त्वचेसाठी निरोगी पोषक घटक असतात. हे त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास, मृत पेशी काढून टाकण्यास आणि नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करते. या साखरेच्या वापराने त्वचा चमकते.

58

ब्राऊन शुगरमध्ये कॅलरीज कमी असल्याने, ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि ते टिकवून ठेवायचे आहे ते याचे सेवन करू शकतात. या साखरेत भूक नियंत्रित करण्याची क्षमता देखील आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यात ते अत्यंत प्रभावी ठरते.

68

मोलॅसिसपासून बनवलेली कच्ची साखर पचन आणि गॅसच्या समस्यांवर उपाय आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही आले आणि एक चमचा ब्राऊन शुगर घालून कोमट पाणी पिऊ शकता. त्यामुळे बद्धकोष्ठता त्वरित दूर होण्यास मदत होते.

78

ब्राऊन शुगरमधील अँटी-एलर्जिक गुणधर्म दम्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. श्‍वसनाचा त्रास असणा-यांनी कोमट पाण्यात देशी साखर मिसळून प्यायल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

88

बाळंतपणानंतर ओटीपोट, पाठ यांसारख्या भागात दुखणे बरे करण्यास मदत करते. तसेच गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना अनुभवलेल्या काही वेदना आणि स्नायूंचे क्रॅम्प्स बरे करण्यासाठी ब्राऊन शुगर वेदनाशामक म्हणून वापरली जाते.

  • FIRST PUBLISHED :