काळ्या गाजरांची चव केशरी गाजरांपेक्षा चांगली असते. याशिवाय त्याचा गोडवाही चांगला आहे. काळे गाजर खाल्ल्यानंतर बराच वेळ तोंडात त्याची छान चव राहते.
काळ्या गाजरामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी सारखे पोषक घटक असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जाणून घेऊया काळ्या गाजराचे फायदे.
काळ्या गाजरामध्ये अँथोसायनिन मुबलक प्रमाणात आढळते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. काळे गाजर रक्तातील अशुद्धता स्वच्छ करून रक्ताभिसरण सुधारते. गाजराचा रस शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतो.
काळ्या गाजरामध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पाचन तंत्राला चालना मिळते. काळे गाजर बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे, छातीत जळजळ, अस्वस्थता, अतिसार यांसारखे आजार बरे करते.
काळ्या गाजराच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस दोन्ही नष्ट करण्याची क्षमता असते. काळे गाजर सर्दी आणि फ्लूपासून देखील संरक्षण करते.
काळ्या गाजरामध्ये व्हिटॅमिन सी असते, हे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवते. ज्यामुळे शरीराला बाह्य संसर्ग किंवा रोगापासून संरक्षण मिळते.
काळ्या गाजरामध्येही व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. यामध्ये बीटा कॅरोटीनदेखील असते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने चष्म्याचा नंबर कमी होऊन दृष्टी वाढू शकते.
काळ्या गाजरांचे सेवन अल्झायमरपासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे काही अभ्यासातून दिसून आले आहे. यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका कमी होतो. यासाठी गाजरातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँथोसायनिन घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
काळ्या गाजरमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. त्यात अँथोसायनिन रसायन असल्यामुळे ते दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याशिवाय यामध्ये असलेले अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. ही गाजरे शरीरात कार्सिनोजेनिक कणांच्या प्रवेशास प्रतिबंध करतात.
काळे गाजर मधुमेहींसाठी रामबाण औषधाचे काम करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)