आपण खात असलेले अन्न आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही प्रभाव टाकतात. त्यामुळे आयुर्वेदापासून आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंत सर्वजण खाण्याच्या बाबतीत काय योग्य-काय अयोग्य आणि कोणत्यावेळी काय खावे हे सुचवतात.
E Times ने माहिती दिली आहे की, चीजमुळे झोपेदरम्यान अस्वस्थता येते आणि परिणामी भयानक स्वप्ने पडतात. ब्रिटिश चीज बोर्डाच्या मते, स्टिल्टन चीज सर्वात वाईट आहे, रात्रीच्या वेळी ते अजिबात खाऊ नये.
चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते, जे गाढ झोप येऊ देत नाही. त्यामुळे अस्वस्थता आणि भयानक स्वप्न पडतात हे काही अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे.
फ्रंटियर्स ऑफ सायकॉलॉजीच्या अभ्यासानुसार, चिप्स सारख्या स्निग्ध पदार्थांमध्ये असलेले फॅट्स पचायला वेळ लागतो. त्यामुळे रात्री झोपेत अस्वस्थता, झोप मोडणे आणि बऱ्याचदा भयानक स्वप्नही पडतात.
आयुर्वेदानुसार, रात्री दह्याचे सेवन केल्याने श्लेष्मा तयार होतो, श्वासोच्छवासाच्या यंत्रणेत अडथळा येतो, मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि त्यामुळे अस्वस्थता आणि भयानक स्वप्ने पडतात.
ब्रेड आणि पास्तामध्ये भरपूर स्टार्च आणि कार्बोहायड्रेट असतात, जे शरीरात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि साखरयुक्त पदार्थांसारखे परिणाम करतात, ज्यामुळे सारखी झोप मोडते आणि भयानक स्वप्न पडतात.
गरम सॉसचे जास्त सेवन केल्याने अनेकदा शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे झोपेच्या REM (रॅपिड आय मोशन) अवस्थेदरम्यान स्वप्नांच्या निर्मितीमध्ये बदल होतो आणि भयानक स्वप्ने पडतात.