तुमचा एसी विंडो किंवा स्प्लिट किंवा सेंट्रल सिस्टम असू शकतो. हलक्या पावसात AC चालवताना सहसा धोका नसतो. उलट हलक्या पावसात बाहेरच्या युनिटमध्ये साचलेली धूळ आणि घाणही साफ होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण मुसळधार पाऊस आणि वादळाच्या काळात काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
आउटडोअर युनिट प्रोटेक्शन : अतिवृष्टीच्या परिस्थितीत आउटडोअर युनिटला थेट पावसापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसे तर एसी युनिट्स बाहेरच्या समस्यांशी लढण्यासाठी त्याप्रकारे बनवलेले असतात. परंतु अतिवृष्टीमुळे बाहेरील युनिटचे नुकसान होऊ शकते. तसेच युनिटच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे एसीचे घराबाहेरचे युनिट योग्य प्रकारे झाकलेले नसेल तर अतिवृष्टीदरम्यान एसी बंद करा.
इलेक्ट्रिकल सेफ्टी : एसीसह कोणतेही इलेक्ट्रिकल उपकरण वापरताना इलेक्ट्रिकल सेफ्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे तुमच्या एसी युनिटचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्या. वायरिंगमध्ये काही समस्या असल्यास पावसाळ्यात एसी बंद करा आणि पुन्हा सुरू करण्यापूर्वी व्यावसायिकांची मदत घ्या.
काही संभाव्य धोके : पाऊस पडत असताना एअर कंडिशनर चालवल्याने काही वेगळे परिणाम होऊ शकतात. कारण ते जास्त तापू शकते आणि खराब होऊ शकते. याचे कारण म्हणजे पावसामुळे तुमचे एअर कंडिशनर कॉइल्स ओले होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे घर थंड करण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात एसी चालवून घरात पाणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला पैसे आणि वीज बिल वाचवायचे असेल तर तुम्ही पावसाळ्यात एसी वापरणे टाळू शकता.
आता प्रश्न असा आहे की, वादळात एसी चालवता येईल का? तर याचे उत्तर नाही असे आहे. वादळाच्या वेळी एसी चालवू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे केवळ उर्जेचा अपव्ययच होत नाही. तर त्यासोबत एखादेवेळी तुमच्या घरावर वीज पडली तर ती विद्युत लाईन्समधून प्रवास करू शकते आणि तुमच्या एसी युनिटचे नुकसान करू शकते.