NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / Carrot Health Benefits : तुम्हाला माहिती नसतील असे गाजर खाण्याचे फायदे; फक्त डोळेच नाही संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त

Carrot Health Benefits : तुम्हाला माहिती नसतील असे गाजर खाण्याचे फायदे; फक्त डोळेच नाही संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त

गाजर कोणत्याही ऋतूमध्ये उपलब्ध असते. गाजरांमध्ये अनेक पोषक तत्व असतात त्यामुळे नियमित गाजराचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात.

17

वजन कमी करण्यात मदत करते : गाजर हे कमी कॅलरी आणि फायबर युक्त अन्न आहे. गाजरांमध्ये असलेले पेक्टिन, मुख्य फायबर, फायबरचे एक विरघळणारे प्रकार आहे, ज्यामुळे गाजर खाल्यावर तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त प्रमाणात खाणे टाळता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या आहारात गाजराचा समावेश केल्याने तुम्हाला वजन कमी करणे सोपे जाईल.

27

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम : गाजरमध्ये बीटा-कॅरोटीनच्या स्वरूपात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन ए समृद्ध अन्नपदार्थ रातांधळेपणा आणि वय-संबंधित दृष्टी कमी होण्यास प्रतिबंध करतात. अँटिऑक्सिडंट्स सेल्युलर नुकसान दुरुस्त करण्यास आणि पुढील नुकसान टाळण्यास मदत करतात. गाजरामुळे डोळ्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

37

कर्करोगाचा धोका होतो कमी : गाजर कॅरोटीनोइड्सने भरलेले असतात. हे कॅरोटीनोइड्स अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे तुमच्या शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स नष्ट करण्यासाठी लढतात. हे मुक्त रॅडिकल्स कर्करोगास कारणीभूत असतात.

47

प्रतिकारशक्ती वाढवते : गाजर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने परिपूर्ण असतात. यामध्ये व्हिटॅमिन A, K1, B6, बायोटिन, पोटॅशियम आणि इतर मिनरल्स आहेत. त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी गाजर खूप महत्वाचे आहे. कारण ते हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीला प्रोत्साहन देते. यातील पोटॅशियम रक्तदाब राखण्यास मदत करते.

57

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते : गाजरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे इतर अनेक पदार्थांच्या तुलनेत रक्तातील साखरेमध्ये अगदी कमी प्रमाणात वाढ होते. म्हणून मधुमेह असलेल्या लोकांसाठी गाजर चांगले मानले जाते.

67

पचनक्रिया सुधारण्यास मदत करते : गाजरात फायबरचे प्रमाण जास्त असते. म्हणून ते पचनक्रिया निरोगी राखण्यास आणि पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करतात. तसेच हे पचन समस्या आणि बद्धकोष्ठता समस्या टाळू शकते. गाजराचा रस घरी सहज तयार करता येतो.

77

केस आणि त्वचेसाठी उपयुक्त : गाजरात फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ते त्वचेसह केसांच्या वाढीस मदत करतात. म्हणूनच कॉस्मेटिक कंपन्या त्यांच्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये गाजराचा उल्लेख करण्याचे हे देखील एक कारण आहे. तुमच्या रोजच्या आहारात गाजराचा समावेश करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास गाजराचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

  • FIRST PUBLISHED :