झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपली असली तरी चाहते मात्र मालिकेला फारच मिस करताना दिसत आहे.
मालिकेची नुकतीच सक्सेस पार्टी आयोजीत करण्यात आली होती.
मालिकेतील सगळे कलाकार या पार्टीला उपस्थित होते.
मालिकेची निर्माती श्वेता शिंदेही या पार्टीला उपस्थित होती.
दरम्यान मालिकेचा शेवट हा अनपेक्षित होता. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता मालिकेच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू झाली आहे.
अद्याप मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र चाहते यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं.