'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओम अर्थातच अभिनेता शाल्व किंजवडेकरचा गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न झाला आहे.
ओम म्हणजेच अभिनेता शाल्वला आपल्या आयुष्यातील खरी स्वीटू भेटली आहे.
शाल्वने आपली गर्लफ्रेंड श्रेया डफलापुरकरसोबत साखरपुडा केला आहे. या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
हे फोटो समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रेटी शाल्व आणि श्रेयावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
नुकतेच या दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शाल्व आणि श्रेया एकेमकांसोबत रोमँटिक पोझसुद्धा दिल्या होत्या.
आता या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
हे दोघे लग्नगाठ कधी बांधणार याची माहिती अजून समोर आली नसली तरी शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.