बिग बॉसमध्ये असलेल्या सुंबूलचा जन्म 15 नोव्हेंबर 2003मध्ये झाला. तिला लाडानं गूनगून अशी हाक मारतात.
मध्यप्रदेशात राहणारे तिचं वडील हसन खान हे देखील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.
सुंबूलला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड होती.
सुंबूल 6 वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि तेव्हापासून वडिलांनी तिला सांभाळलं. तिच्या बहिणीनं तिचा सांभाळ केला.
शाळेत असताना सुंबूल रामलिलामध्ये भाक घ्यायची. वडिलांच देखील कलेवर प्रेम असल्यानं त्यांचा पहिल्यापासून तिला सपोर्ट होता.
सुंबूलनं 2011मध्ये चंद्रगुप्त मौर्य या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं.
त्यानंतर 2013 साली आलेल्या जोधा अकबर या सिनेमातही तिनं छोटी भूमिका केली होती. सिनेमात ती अकबरची भाची दाखवण्यात आली होती.
त्याचप्रमाणे सुंबूल DIDलिटिल मास्टर्स सारख्या अनेक रिअँलिटी शोमध्ये दिसली आहे.
सोशल मीडियावर सुंबूलला फॉलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे.
इमली या मालिकेमुळे सुंबूलला खरी ओळख मिळाली. या मालिकेत तीनं मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीबरोबर स्क्रिन शेअर केली होती.
सुंबूलनं देखील इतर मुलांसारखं मोठं व्हाव अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. मात्र बिग बॉसमध्ये गेल्यानं मुलीचं चरित्रहनन झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.