रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमॅन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी धाकटी सूनेचं आगमन होणार आहे.
धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची रोका समारंभ म्हणजेच साखरपुडा आज पार पडला.
राधिका आणि अनंत अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ते एमेकांना डेट करत होते.
अंबानींची नवी सून नेमकी आहे कोण? काय करते? जाणून घ्या.
अंबानी कुटुंबात नीता अंबानी यांच्यानंतर राधिका ही दुसरी व्यक्ती आहे, जिने भरतनाट्यम नृत्यप्रकारात अरंगेत्रम केलं आहे.
राधिका ही मागील 8 वर्षांपासून गुरू भावना ठाकर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. जून 2022मध्ये तिनं अरंगेत्रम पूर्ण केलं.
अंबानींच्या घराची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट ही शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.
राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.
राधिका ही अनेक वर्ष 'श्री निभा आर्ट आर्ट फाउंडेशन'च्या संस्थापिका 'गुरू भावना ठाकर' यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहे.
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिकाच्या अंरगेत्रमचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता.
राधिकाला ट्रेकिंग आणि स्विमींग करणं आवडतं.
अंबानींची लाडकी सून घरात सर्वांची लाडकी आहे.
सासू नीता अंबानी यांच्याबरोबर तिचं खास नातं आहे. दोघी भरतनाट्यम डान्सर असल्याचं त्यांच्यात खास बॉडिंग आहे.
तर सासरे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबरोबरही राधिकाचे चांगले संबंध आहेत.