बॉलिवू़डची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)आज देशातील नामवंत गायिका आहे. पण एक काळ असाही होता जेव्हा नेहा फारच सामान्य जीवन जगत होती. तर एका भाड्याच्या खोलीत राहत होती.
नेहाने ऋषिकेशमध्ये एक भव्य द दिव्य असा बंगला बांधला आहे. जो अतिशय अलिशान आणि तितकाच भव्य आहे. नेहाने तिच्या दोन्ही घरांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
नेहाने नव्या घरासोबतच तिच्या जुन्या घराचेही फोटो शे्र केले आहेत. तिला आजही तिचे जुने दिवस आठवतात.
नेहाचा जन्म याच लहानशा खोलीत झाला होता. जी की त्यांची स्वतःची नव्हती. ते तिथे भाड्याने राहायचे.
नेहा लहाणपणापासून जागरणांमध्ये भजन गायची तिच्या भावा बहिणींसोबत तिने अनेक रात्री अशाच गात काढल्या होत्या. असही तिने काही मुलाखतींत सांगितलं होतं.
नेहा आपल्या कुटुंबासोबत गाण्यासाठी जायची त्यामुळे तिचे कोणी मित्रही बनले नव्हते.
नेहाने मागील वर्षी रोहन प्रीत सिंग याच्याशी लग्नगाठ बांधली होती.
नेहाने 'इंडियन आयडल' शो मध्ये सहभाग घेतला होता पण तिला बाहेर जाव लागलं होतं. तर नेहा आज या शो ची जज आहे.
नेहाने आज देशातच नाही जगभरातही अनेक चाहते निर्माण केले आहे. ती एक यशस्वी गायिका आहे.