NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मटण आणि दारूच्या आहारी गेले होते रजनीकांत, सिगारेट ओढण्याला तर राहिलं नव्हतं माप, 'या' व्यक्तीनं केलं व्यसनमुक्त

मटण आणि दारूच्या आहारी गेले होते रजनीकांत, सिगारेट ओढण्याला तर राहिलं नव्हतं माप, 'या' व्यक्तीनं केलं व्यसनमुक्त

चित्रपटाचा हिरो होण्याआधी रजनीकांत यांना दररोज चिकन-मटण, दारू आणि सिगारेट सारख्या गोष्टींचं व्यसन लागलं होतं. पुढे चित्रपटसृष्टीत आल्यावर तर या वाईट सवयींमध्ये वाढच झाली.

16

अभिनयात येण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते पण नंतर आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर ते हिरो बनले हे तर सर्वांना माहितच आहे. रजनीकांत यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, जेव्हा ते बस कंडक्टर होते तेव्हा त्यांना अनेक वाईट सवयी लागल्या होत्या, ज्या त्यांनी नंतर सोडल्या. चित्रपटाचा हिरो होण्याआधी त्यांना दररोज चिकन-मटण, दारू आणि सिगारेट सारख्या गोष्टींचं व्यसन लागलं होतं. पुढे चित्रपटसृष्टीत आल्यावर तर या वाईट सवयींमध्ये वाढच झाली.

26

रजनीकांत यांचे मेहुणे आणि अभिनेते-नाटककार वाय. जी. महेंद्र यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ते म्हणाले की ते वायजी महेंद्र यांचे खूप आभारी आहेत कारण त्यांच्यामुळेच ते त्यांची पत्नी लता यांना भेटू शकले. त्यानंतर त्यांनी धूम्रपान आणि मद्यपान यांच्या आहारी जाण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याच्या संघर्षाची कहाणी सांगितली.

36

यावेळी रजनीकांत म्हणाले, 'वायजी महेंद्र यांच्याबद्दल मी काय सांगू? त्यांनीच माझी लताशी ओळख करून दिली आणि माझं लग्न त्यांच्याशी लावून दिलं. मी आता 73 वर्षांचा आहे आणि माझी पत्नी माझ्या तब्येतीचे कारण आहे. मी बस कंडक्टर असताना वाईट संगतीमुळे मला अनेक वाईट सवयी लागल्या. मी दिवसातून दोनदा मटण खायचो. मी रोज दारू प्यायचो आणि मी किती सिगारेट ओढत होतो, ज्याची गणनाच करू शकत नाही. या क्षेत्रात आल्यावर पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर यात वाढ झाली.

46

मात्र, नंतर रजनीकांत यांनी या सर्व सवयींना लगाम घातला आणि आपली संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकली. यानतर रजनी कांत यांनी शाकाहारी लोकांबद्दलचा आपला पूर्वीचा दृष्टीकोन सांगितला, जे आता ते स्वत: आहेत. मात्र, त्यांची पत्नी लता यांचे त्यांच्यावरील प्रेम आणि योग्य वैद्यकीय उपचार यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला.

56

यावेळी रजनीकांत म्हणाले, "रोज सकाळी मला मटण पाया, अप्पम आणि चिकन खावं वाटत होतं. त्याकाळी मी शाकाहारी लोकांकडे तुच्छतेने पाहत असे.. खरं सांगायचं तर सिगारेट, अल्कोहोल आणि मांस हे एक धोकादायक कॉम्बिनेशन आहे. जे लोक कोणत्याही मर्यादेशिवाय हे सर्व करतात, ते 60 वर्षांपर्यंत निरोगी राहू शकलेले नाहीत. यानतर अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. याची अनेक उदाहरणे आहेत.. पण लतानेच आपल्या प्रेमाने मला बदलून टाकले. शिवाय डाक्टरांचा देखील यात मोठा हात आहे. या सगळाबद्दल वाय. जी. महेंद्र यांचे आभार.

66

2014 मध्ये आरोग्याच्या काही समस्यांमुळे रजनीकांत शाकाहारी ऐवजी वेगन झाल. आता ते साधे जेवण जेवतात आणि निरोगी जीवन जगतात.

  • FIRST PUBLISHED :