NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / #WeekendPlan : संध्याकाळी दांडीया दुपारी मस्त नाटक! 'या' नाटकांचे दमदार प्रयोग नक्की पाहा

#WeekendPlan : संध्याकाळी दांडीया दुपारी मस्त नाटक! 'या' नाटकांचे दमदार प्रयोग नक्की पाहा

रात्री मस्त दांडीया खेळण्याचा प्लान असेलच पण सकाळी दुपारी तुमच्या जोडीदाराबरोबर पहा या दमदार मराठी नाटकांचे प्रयोग. जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणती नाटक सुरू आहेत.

112

सगळीकडे नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. या विकेंडला दणकूण दांडिया खेळायचा तुमचा प्लान असेलच पण दांडीया तर रात्री खेळणार सकाळी आणि दुपारी काय करताय? तुमच्या जवळच्या नाट्यगृहात दमदार नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. नक्की पाहायला जा.

212

धनंजय माने इथेच राहतात का हे धम्माल कॉमेडी नाटक 1 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे.

312

तुफान विनोद नाटक वाकडी तिकडी या नाटकाचा प्रयोग शनिवारी 1ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे आहे. तर 2 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे आहे.

412

निर्मिती सावंत आणि वैभव मांगले यांचं संज्या छाया या नाटकाचा 2 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे प्रयोग रंगणार आहे.

512

प्रियदर्शन जाधव स्टारर 'हसता हसवता' या नाटकाचा प्रयोग 1 ऑक्टोबकरला दुपारी 4.30 वाजता आचार्य अत्रे कल्याण याठिकाणी असणार आहे. तर रौप्य महोत्सवी प्रयोग 2 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले याठिकाणी होणार आहे.

612

हिच तर फॅमिलीची गंमत आहे नाटकाचा प्रयोग शनिवारी 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे. तर 2 ऑक्टोबर रविवारी सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.

712

निवेदिता सराफ,सुयश टिळक, रश्मी अनपट स्टारर 'मी स्वरा आणि ते दोघं' हे नाटकसुद्धा लोकप्रिय ठरत आहे. या नाटकाचा प्रयोग दसऱ्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे.

812

अभिनेता संदीप पाठकचं धम्माल नाटक वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचा 444वा प्रयोग 1 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे. तर 2 ऑक्टोबरला 445वा प्रयोग दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे रंगणार आहे.

912

माय फ्रेंड गोरिया या बालनाट्याचा रौप्य महोत्सवी प्रयोग 1 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. तर रविवारी 2 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली तर रात्री 8 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.

1012

आवर्त या नाटकाचा प्रयोग 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.

1112

प्रिया बापट निर्मित आणि उमेश कामत, मृगा गोडस स्टारर 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचा प्रयोग 2 ऑक्टोबरला दुपारी ४.15 वाजता प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे होणार आहे.

1212

ज्या नाटकाचा समावेश मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे असं संगीत देवबाभळी नाटकाचा प्रयोग 2 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.

  • FIRST PUBLISHED :