अभिनेता वैभव मांगलेनं राम राम ठोकलेल्या अलबत्या गलबत्या नाटकासह अनेक नवोदित मराठी नाटकांचे प्रयोग या विकेंडला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये सुरू आहेत. या विकेंडचा प्लान नाटकाचे प्रयोग पाहून पूर्ण करा.
नव्यानं रंगभूमीवर आलेलं चारचौघी नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवाली येथे आहे. तर रविवारी 25 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे आहे.
प्रिय भाई... एक कविता हवी आहे चा शो शनिवारी 24 सप्टेंबरला रात्री 9 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे. तर रविवारी 25 सप्टेंबरला सकाळी 11.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे.
तुफान विनोद नाटक वाकडी तिकडी या नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.
खरं खरं सांगा या नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे आहे.
माय फ्रेंड गोरिला या बालनाट्याचा प्रयोग शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता रविद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे होणार आहे.
अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता आचार्य अत्रे कल्याम येथे होणार आहे. तर रविवारी 25 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले तर रात्री 8.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.
तिन पिढ्यांची गोष्ट सांगणारं पत्त्यांचा बंगला हे नाटक शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी ठाणे तर 25 सप्टेंबरलादुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.
हिच तर फॅमिलीची गंमत आहे नाटकाचा प्रयोग रविवारी 25 सप्टेंबरला रात्री 8.30 वाजता दीनानाथ पार्ले येथे होणार आहे.
अ परफेक्ट मर्डर या नव्या नाटकाचा प्रयोग रविवारी 25 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे होणार आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित कुर्रर्रर्रर्र नाटकाचा प्रयोग रविवारी 25 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे.
ज्या नाटकाचा समावेश मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे असं संगीत देवबाभळी नाटकाचा प्रयोग 26 सप्टेंबरला दुपारी 4:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरीवली येथे आहे.
दादा एक गुड न्यूज आहे नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता क्रांतीकारक वासुदेव फडके, पनवेल येथे आहे. तर रविवारी 25 सप्टेंबरला दुपारी 4:30 वाजता सावित्रीबाई तांबे, डोंबिवली येथे आहे.