भयचक्राच गूढ अनुभव देणार 'यू मस्ट डाय' हे नवं कोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एकीकडे प्रेम तर दुसरीकडे थ्रिलर नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत. तुम्ही कोणतं नाटकं पाहणार? पाहा टाइम टेबल
हौस माझी पुरवा या धम्माल नाटकाचा प्रयोग 12 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता कालिदास मुलुंड येथे आहे. तर रविवारी 13 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता वासुदेव फडके पनवेल येथे होणार आहे.
सागर कारंडे प्रमुख भूमिकेत असलेल्या हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचा प्रयोग 12 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ पार्ले येथे होणार आहे.
तिन पिढ्यांची गोष्ट सांगणारा हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकाचा प्रयोग शनिवारी 12 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे रंगणार आहे.
चंद्रकांत कुलकर्णी यांचं चारचौघी हे नाटक 12 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.
संगीत देवबाभळी नाटकाचा प्रयोग 12 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.
अलबत्या गलबत्या या बालनाट्याचा प्रयोग 12 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता डॉ. काशीनाथ घाणेकर ठाणे येथे होणार आहे.
आमने सामने या नाटकाचा प्रयोग रविवारी 13 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे पाहायला मिळणार आहे.
संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई यांच्या तू म्हणशील तसं या नाटकाचा प्रयोग 13 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता आचार्य अत्रे कल्याण येथे होणार आहे.
हास्यजत्रेच्या धम्माल विनोदवीरांचं धम्माल नाटक कुर्रर्रर्र चा प्रयोग 12 नोव्हेंबरला रात्री 8.45 ला विष्णुदास भावे वाशी येथे रंगणार आहे. तर 13 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड येथे रंगणार आहे.
तर खरं खरं सांग नाटकाचा प्रयोग 13 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.
नुकतंच रंगभूमीवर आलेलं 38 कृष्ण व्हिला या नाटकाचा प्रयोग 12 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता सावित्री बाई फुले डोंबिवली येथे होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला 4.30 वाजता भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह मीरा रोड येथे होणार आहे.
अभिनेता सौरभ गोखले, शर्वरी लोहकरे, संदेश जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेलं यू मस्ट डाय हे नवं कोरं नाटक प्रेक्षकांना या विकेंडला पाहायला मिळणार आहे. 12 नोव्हेंबरला रात्री 8 दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. तर रात्री 8.45 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.