बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते होते ज्यांनी काही काळातच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. पण त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना एका छोट्याशा चुकीने त्यांचं करिअर बरबाद झालं.
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं केला 90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्यांना तो टक्कर देईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. तो चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. पण अवघ्या काही वर्षातच 2001 मध्ये त्याचं नाव ड्रग्स प्रकरणात समोर आलं. त्यानंतरया अभिनेत्याचं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.
या यादीत दुसरे नाव आहे शायनी आहुजा याचं. ज्याने 'गँगस्टर' आणि 'भूल भुलैया' सारख्या चित्रपटात काम करून नाव कमावले होते. पण 2009 मध्ये त्याच्यावर आपल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आणि त्याला त्यासाठी 7 वर्षे शिक्षा भोगावी लागली. या अभिनेत्यानं 7 वर्षे तुरुंगात काढली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा परतण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.
अभिजित भट्टाचार्य ज्यांच्या आवाजाने लोकांमध्ये जादू निर्माण केली होती. ९० च्या दशकात त्यांनी अनेक गाण्यांना आवाज दिला. मात्र ते आपल्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत येऊ लागले. त्याने करण जोहर आणि बॉलीवूडच्या तिन्ही खानच्या विरोधात अशी विधाने केली, त्यानंतर त्यांना चित्रपटात काम मिळणे बंद झाले.
'शांती' आणि 'रिश्ते' सारख्या मालिकांमध्ये दिसलेला अमन वर्मा आठवतो का? त्याने 'महाभारत कथा' आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मध्ये यासारख्या सुपरहिट मालिकांमध्येही काम केलं होतं. पण 2005 मध्ये स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर तो वादात सापडला. त्यांच्यावर कास्टिंग काउचचा आरोप झाला. अमन वर्मा 2015 मध्ये 'बिग बॉस 9' मध्ये सहभागी झाला होता, परंतु लवकरच त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले.
या यादीत शक्ती कपूरचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या खलनायिकाच्या भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. पण एका चुकीने सगळं उध्वस्त झालं. खरं तर, एकदा स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याच्यावर कास्टिंग काउचचा आरोप लावण्यात आला. त्याचा थेट परिणाम त्याच्या कामावर झाला. आता क्वचितच कधीतरी ते पडद्यावर दिसतात.
विवेक ओबेरॉयच्या नावाशिवाय ही यादी अपूर्ण आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले. पण करिअरच्या शिखरावर असताना त्याने सलमान खानसोबत पंगा घेतला. सलमानच्या करिअरवर कोणताही परिणाम झाला नाही, पण विवेकला काम मिळणे बंद झाले. याचा उल्लेखही त्याने एका मुलाखतीदरम्यान केला होता. त्याने पडद्यावर नक्कीच पुनरागमन केले, पण स्टारडम परत मिळवता आले नाही.