'विवाह' या चित्रपटातील छुटकी सर्वांच्या मनात घर करून आहे. सिनेमात अमृता रावच्या धाकट्या बहिणीचं नाव रजनी असतं मात्र तिला सारे छुटकी या नावानेच हाक मारत असतात. 'विवाह' मध्ये छुटकीची भूमिका अभिनेत्री अमृता प्रकाश ने साकारली होती.
अमृता प्रकाशला विवाह सिनेमात सावळ्या रुपात दाखवण्यात आले होते. मात्र खऱ्या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे.
अमृता प्रकाशने वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने जाहिरातीपासून सुरुवात केली.
बालकलाकार म्हणून अमृता प्रकाशने जवळपास 50 मोठ्या जाहिरातींमध्ये काम केले. जेव्हा ती नऊ वर्षांची होती, तेव्हा अमृताने टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले.
अमृताने काही टीव्ही शोमध्ये अभिनयासोबतच सूत्रसंचालनही केले. तिने अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत 'क्या मस्ती क्या धूम' हा शो दोन वर्ष होस्ट केला होता.
अमृताने काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. पण राजश्रीचा 'विवाह' सिनेमा मिळाल्याने तिच्या करिअरला मोठे वळण मिळाले.
अमृताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हा सिनेमा तिच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. सिनेमात साकारलेल्या छुटकी या पात्राने तिची कारकीर्दच बदलून टाकली.
अमृता प्रकाश २०२० मध्ये 'पटियाला बेब्स' या टीव्ही शोमध्ये दिसली होती. मात्र यानंतर ती कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. असं असलं तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. अमृता तिचे जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.