टेलिव्हिजनवरून आपल्या अभिनयाला सुरूवात करणारी अभिनेत्री विदुला चौघुले लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ऐन पावसाळ्यात विदुला केदारनाथ ट्रिपला का गेली असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर अखेर समोर आलं आहे.
विदुला तिच्या आगामी महादेव या सिनेमाचा मुहूर्त साजरा करण्यासाठी केदारनाथला गेली होती. केदारनाथ मंदिराबाहेरच क्लापबोर्डचा फोटो तिनं शेअर केला आहे.
महादेव सिनेमात अंकुश आणि विदुला यांच्यासह अभिनेता मनमित पेम देखील दिसणार आहे. सिनेमाच्या अपडेट्स लवकरच समोर येतील.