विकी कौशल आणि कतरीना कैफ बॉलिवूडमधील स्टार कपलपैकी एक आहे. ही जोडी नेहमीच चर्चेत असते.
एका कार्यक्रमात विकीला पत्रकारानं थेट प्रश्न विचारला की, 'जर कतरिनापेक्षा आणखी चांगली कुणी मिळाली तर घटस्फोट घेशील का?' हा प्रश्न ऐकताच विकी चाट पडला.
पण या प्रश्नाला विकीने खास अंदाजात उत्तर दिलं.
विकी म्हणाला,''मला संध्याकाळी घरी जायचंय माझ्या..अशा प्रश्नांची उत्तरं कशाला मागताय माझ्याकडे? मी अजून लहान आहे असे निर्णय घ्यायला..कशाला उगाच काहीही विचारता...''
पण यापुढे विकी जे म्हणाला त्यानं प्रत्येकाला खूश केलं. विकी थेट म्हणाला,''कतरिनाचं आणि माझं नातं जन्मोजन्मीचं आहे...'' असं म्हणताच उपस्थितांना फारच आनंद झाला.
विकीचं हे उत्तर ऐकून आता दोघांचेही चाहते फारच खुश झाले आहेत.
विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहेत.
या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून विकी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे.