'प्यार हुआ इकरार हुआ' म्हणत राज कपूर आणि नर्गिस यांनी प्रेक्षकांना वेड लावलं. राज कपूर एक दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावत असताना राज कपूर आणि नर्गिस यांची लव्ह स्टोरी सर्वत्र चर्चेत विषय ठरला होता.
राज कपूर आणि नर्गिस तब्बल 9 वर्ष रिलेशनमध्ये होते. पण दुर्दैवानं त्यांचं नातं फार वर्ष टिकू शकलं नाही. 9 वर्ष रिलेशनमध्ये असूनही नर्गिस आणि राज कपूर कधीच एकमेकांचे होऊ शकले नाहीत.
नर्गिसनं मदर इंडिया को स्टार सुनील दत्तबरोबर लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचा राज कपूर यांना जबर धक्का बसला होता. स्वत:ला त्यांनी शिक्षा करून घेतली. अनेक महिने ते ढसाढसा रडत होते.
राज कपूर आणि नर्गिस एकमेकांवर अपार प्रेम करायचे. दोघांची जोडी प्रेक्षकांनाही आवडायची. पण राज कपूर यांचं लग्न झालं होतं. ते 5 मुलांचे वडील होते.
नर्गिस देखील राज कपूर यांच्यावर प्रेम करायची. तिनं राज कपूर यांच्याकडे लग्न करण्याचं वचन मागितलं होतं. त्यांनी ते दिलं ही पण कधीच लग्नाचं वचन पूर्ण केलं नाही.
राज कपूर यांनी नर्गिस बरोबर राहण्याचं वचन दिलं होतं पण ते त्यांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच कृष्णा राज कपूर यांना सोडायला तयार नव्हते.
राज कपूर यांच्या अशा वागण्याला नर्गिस कंटाळली. लग्न न करता राहणं तिला मान्य नव्हतं. तेव्हा एकेदिवशी तिनं अभिनेता सुनिल दत्तबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता की, नर्गिसचं लग्न झाल्याचं राज यांना कळल्यानंतर ते हतबल होऊन ढसाढसा रडले होते.
राज कपूर दररोज दारू पिऊन यायचे. रात्र अपरात्र घरी येऊन रडायचे. अनेकदा स्वत:ला ते सिगरेटचे चटके द्यायचे. बाथटबमध्ये झोपून ते जोरजोरात ओराडचे. नर्गिसच्या लग्नाचा त्यांना खूप त्रास झाला होता.
नर्गिसने मला धोका दिला असा खुलासा राज कपूर यांनी स्वत: 1986 साली एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत केला होता.