NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / उन्नती पांडेचा बॉलिवूडमध्ये जलवा; आमदारही झाले जबरा फॅन

उन्नती पांडेचा बॉलिवूडमध्ये जलवा; आमदारही झाले जबरा फॅन

झाशीतील मुलगी 2019 साली आपलं स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच मुंबईत आली. प्रचंड मेहनत आणि चढउतार पाहिल्यानंतर उन्नतीच्या वाट्याला आता यश आलं आहे.

19

उन्नती पांडे या तरुणीने 'अजमेर 92' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

29

उन्नतीचे वडील दिलीप पांडे हे झाँसीतील नामवंत समाजसेवक आहेत. कोरोनाकाळात गरजवंतांसाठी जेवण आणि औषधांची ते सोय करत असत. 'आज माझी मुलगी मोठ्या पडद्यावर आली, ही संपूर्ण झाँसीसाठी अभिमानास्पद बाब आहे', असं ते म्हणाले.

39

उन्नतीची आई शालिनी पांडे या शिक्षिका आहेत. त्या शालेय विद्यार्थ्यांना शिकवतात. त्या म्हणाल्या, 'उन्नतीला लहानपणापासूनच स्टेजचं फार आकर्षण होतं. ती आरशात उभी राहून हिरोईनसारखा अभिनय करायची.'

49

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उन्नतीला लहानपणापासूनच डान्स, अभिनय आणि मिमिक्री करण्याची आवड होती. ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. शिवाय तिच्या या आवडीला कुटुंबियांनीही छान प्रोत्साहन दिलं.

59

उन्नतीने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली. मॉडेलिंगचे काही कार्यक्रम केल्यानंतर तिला थोडीफार ओळख मिळाली. मग तिने काही म्युझिक अल्बममध्ये काम केलं...अखेर आता तिला बॉलिवूड चित्रपटाच्या रूपात मोठा ब्रेक मिळाला आहे.

69

अजमेर 92 चित्रपट तीन प्रमुख भूमिकांवर आधारित आहे. यातील एक भूमिका उन्नतीने साकारली आहे. 21 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहांमध्ये त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

79

उन्नती म्हणाली की, 'चित्रपटात काम करण्याचं स्वप्न लहानपणापासून पाहिलं होतं. त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते. शिवाय मला माझ्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांनी मला या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित केलं.'

89

अजमेर 92 चित्रपट पाहिल्यानंतर झाँसीचे आमदार रवी शर्मा यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, इथली लेक बॉलिवूडपर्यंत पोहोचली ही झाँसीसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

99

उन्नती यापूर्वी 'क्लास ऑफ 2020' या वेबसीरिजमध्ये दिसली आहे. यातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. आता लवकरच ती इतर चित्रपटांमधूनसुद्धा चाहत्यांच्या भेटीला येईल.

  • FIRST PUBLISHED :