सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्त शैलीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तिच्या वक्तव्यांमुळे ती वादात देखील सापडते.
उर्फी जावेदने शक्तीमान या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला आहे.
उर्फी जावेदने मुकेश खन्ना यांना वेडा म्हटले असून त्यांना तुरुंगात टाका असेही म्हटले आहे. उर्फी जावेदची हे बिनधास्त वक्तव्य चाहत्यांना मात्र रुचलेलं नाही.
जेव्हापासून साऊथ स्टार प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट आला आहे, तेव्हापासून तो त्याच्या वादात सापडला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेले संवाद आणि वेशभूषा यामुळे सर्वजण या चित्रपटावर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत मुकेश खन्ना यांनीही नुकतीच ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
'तुम्हाला धार्मिक ग्रंथांचा अवमान करण्याचाअधिकार कोणी दिला' असं म्हणत मुकेश खन्नांनी आदिपुरुषला जाळा असं म्हणत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे उर्फी जावेद मुकेश खन्ना यांच्यावर चांगलीच संतापली आहे.
उर्फी जावेदने गुरुवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, 'हा माणूस पूर्णपणे पागल आहे.' यासोबत उर्फीने सांगितले की, चित्रपट थोडा खराब आहे हे मला मान्य आहे पण त्यासाठी एखाद्याला जाळणे योग्य नाही. इतकेच नाही तर उर्फी जावेदने पुढे लिहिले की, 'या व्यक्तीला हिंसा भडकावल्याबद्दल तुरुंगात टाकले पाहिजे.'
मुकेश खन्ना यांच्याबद्दलच्या अशा ट्विटमुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुकेश खन्ना यांनी याआधी चित्रपटातील पुरुष पात्रांच्या वेशभूषा आणि राघवची भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या मिशांवर आक्षेप घेतला होता.
एकीकडे उर्फी जावेद तिच्या बिनधास्त दिसणार्या कपड्यांमुळे चर्चेत राहतो, तर दुसरीकडे शक्तीमानची भूमिका साकारणारा अभिनेता मुकेश खन्नाही अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो.