NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Uorfi Javed: उर्फीचं इतक्या वेळा झालं ब्रेकअप; एका बॉयफ्रेंडच्या नावाचा बनवलेला टॅटू नंतर त्यानेच दिला असा धोका

Uorfi Javed: उर्फीचं इतक्या वेळा झालं ब्रेकअप; एका बॉयफ्रेंडच्या नावाचा बनवलेला टॅटू नंतर त्यानेच दिला असा धोका

'बिग बॉस ओटीटी' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलेली उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र आणि बोल्ड आउटफिट्समुळे चर्चेत असते. पण तिच्या लव्ह लाईफबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. नुकत्याच एका मुलाखतीत उर्फीने तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे.

18

उर्फी जावेद नुकतीच रणवीर अलाहाबादीयाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने अनेक खुलासे केले.

28

उर्फी जावेदने सांगितले की, तिचे अनेकदा मन दुखले आहे. तिने प्रेमात अनेक वेळा धोका खाल्लेला आहे.

38

कारण विचारल्यावर अभिनेत्री म्हणाली की, 'पूर्वी तिच्याकडे पैसे नव्हते, पण आता आहेत. उर्फीने एका बॉयफ्रेंडचाही उल्लेख केला ज्याच्यासोबत तिचे ब्रेकअप झाले होते.

48

अभिनेत्रीने सांगितले की, तिने त्याच्या नावाचा टॅटू काढला होता, ज्यामुळे तिची आई आणि बहीण तिची खूप चेष्टा करतात.

58

उर्फी म्हणाली, “माझा एक बॉयफ्रेंड होता, त्याच्या नावाचामी टॅटू काढला आहे. 15 ऑक्टोबर रोजी मी हातावर टॅटू काढला. मी पण खुश होते. त्याने पण माझ्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू काढला होता. पण सगळ्यांना त्याने वडिलांची बर्थ डेट आहे असं सांगितलं.'

68

'एवढंच नाही तर तो इतर मुलींसोबत फ्लर्ट करायचा. जेव्हा मी माझा टॅटू झाकून घेतला तेव्हा तो चिडला. मग आमचं ब्रेकअप झालं. आताही माझी आई आणि सर्वजण माझी चेष्टा करतात त्या टॅटूमुळे.'

78

तसंच उर्फीने सांगितलं 'मला कोणासोबतही प्रेम व्हायचं. माझं अनेक वेळा ब्रेकअप झालंय. पण आता मी तशी नाही.'

88

याचं कारण सांगत ती म्हणाली, 'कारण आता माझ्याकडे पैसे आणि काम आहे. तेव्हा दोन्ही नव्हतं त्यामुळे मी असं वागले.'

  • FIRST PUBLISHED :