छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Survey) सध्या मालिकांत दिसत नसली तरीही सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. पहा अभिनेत्रीचे मनमोहक फोटोज.
अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेने प्रेक्षकांवर छाप सोडली होती.
ऑफ व्हाईट ड्रेस मध्ये शिवानी अतिशय सुंदर दिसत आहे.
शिवानीने 'नव्या' (Navya) या हिंदी मालिकेतून आपल्या करिअर ला सुरूवात केली होती.
त्यानंतर शिवानीने 'देवयानी' (Devyani) या लोकप्रिय मालिकेत काम केलं. यानंतर शिवानी वा तुफान लोकप्रियता मिळाली होती. अभिनेता संग्राम साळवीसोबत तिची केमिस्ट्री हीट ठरली होती.
या मालिकेनंतर शिवानी पुन्हा एकदा हिंदी टेलिव्हिजन कडे वळली. तिने अनामिका , जाना ना दिलसे दूर, लाल इश्क या लोकप्रिय मालिकांत काम केलं आहे.
सुंदर माझं घर, जीवाला गुंतवावे या मराठी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
2019 मध्ये शिवानी छोट्या पडद्याचा लोकप्रिय शो बिग बॉस मराठी मध्येही झळकली होती. त्यानंतर शिवानी फार चर्चेत होती. मात्र ती विजेती ठरू शकली नाही.
2019 मध्ये शिवानीने ट्रिपल सीट या मराठी चित्रपटातही काम केलं आहे.
ट्रिपल सीट चित्रपटासाठी शिवानी ला फिल्मफेअर मराठी हा पुरस्कार देखिल मिळाला आहे.
शिवानी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते,