तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सर्वांचा लाडका सनी दा म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे.
राज हंचनाळे आता सोनी मराठीवरील 'जिवाची होतीया काहिली' या नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मालिकेची सध्या चर्चा होत आहे. दर दुसरीकडे अभिनेता राज हंचनाळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
राजनं मागील वर्षीच लग्नगाठ बांधली . राजनं मोली डेसवालबरोबर लग्न केलं.
अनेक वर्ष डेट केल्यानंतर राज आणि मोली यांनी लग्न केलं. दोघांचे रोमँटिक फोटो तो नेहमीच शेअर करत असतो.
दरम्यान मोलीच्या वाढदिवसाला सगळ्यांचा लाडका सनी दा चांगलाच रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मोलीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राजनं तिला 'हे हॉट्टी हॅप्पी बर्थ डे', असं म्हणत हटके शुभेच्छा दिल्यात.
राजनं रोमँटिक होत बायको, प्रेम, चंद्र, बालकनी असे हॅशटॅगही शेअर केले आहेत.
बालकनीमध्ये कपल पोझेस देत दोघांनी काढलेला फोटो राजच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
राज आणि मोली यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचं नवं घर खरेदी केलं आहे. दोघेही सध्या नव्या घरात शिफ्ट झाले असून त्याच घरातील हे रोमँटिक फोटो राजनं शेअर केलेत.
राज आणि मोली दोघेही सध्या त्यांच्या कामात बिझी असले तरी एकमेकांना वेळ देत खास फोटो शेअर करताना दिसतात.