NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tunisha Sharma:12 वर्षीच मिळाला पहिला पे-चेक तर टेबलाखाली सापडलं पहिलं प्रेमपत्र; असं होतं तुनिषाचं आयुष्य

Tunisha Sharma:12 वर्षीच मिळाला पहिला पे-चेक तर टेबलाखाली सापडलं पहिलं प्रेमपत्र; असं होतं तुनिषाचं आयुष्य

दास्तान ए कबूल मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. सीरियलच्या सेटवरच तुनिषाने गळफास लावत आपलं आयुष्य संपवलं आहे. या बातमीने सगळीकडेच खळबळ माजली आहे. कमी वयात एवढी प्रसिद्धी मिळविल्यानंतर तुनिषाच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या कारकिर्दीविषयी सविस्तर जाणून घ्या.

110

अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या दु:खद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

210

मृत्यूच्या अवघे 6 तास आधी तुनिषाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे आणि फोटोमध्ये तिने मोटिव्हेशनल मेसेज लिहिला आहे.

310

तुनिशा शर्माचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सेटवर मेकअप करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला मेकअप आणि हेअरस्टाइलची संपूर्ण टीम आहे. शूटिंगपूर्वी ती तयार होत आहे, तसेच टीमशी संवाद साधत आहे.

410

तुनीषाने आतापर्यंत 6 हून अधिक मालिका आणि 3 मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

510

तुनिषाने अवघ्या 20 वर्षात यशाचे शिखर गाठले होते. तीने लहानपणीच अभिनयाच्या दुनियेतपाऊल ठेवलं होतं. तुनिषाला अवघ्या 12 वर्षात पहिला पे-चेक मिळाला होता.

610

तसेच तिने एका मुलाखतीत पहिल्या प्रेमपत्राची आठवण सांगितली होती. ती म्हणाली होती, 'आमच्यात काहीही झाले नसले तरी मला त्याचे प्रेमपत्र अजूनही आठवते.'

710

4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या तुनिषाने सोनी टीव्हीच्या सीरियल 'महाराणा प्रताप'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.

810

कतरिना कैफ स्टारर 'फितूर' या चित्रपटात कतरिनाच्या बालपणीची भूमिका साकारून तुनिषाने बरीच प्रशंसा मिळवली.

910

टीव्ही सीरियलशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. तसेच कतरिनाच्या बार बार देखो या चित्रपटात त्याने कतरिना कैफच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

1010

तिच्या जाण्याने सर्वांनांच जबर धक्का बसला असून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :