अभिनेत्री अमृता पवार हि नुकतीच लग्नबंधनात अडकली. पती नीलबरोबर तिनं साताजन्माच्या गाठी बांधल्यात.
अमृताच्या लग्नाचे फोटो समोर आले असून नवरीच्या वेशातील अमृताला पाहून सगळ्यांनीच आनंद व्यक्त केलाय.
अमृतानं लग्नाच्या प्रत्येक विधींसाठी वेगळा लुक कॅरी केला होता.
लग्नात पुण्यवचन हा विधी फार महत्त्वाचा मानला जातो. अमृतानं पुण्यवचनासाठी खास लुक केला होता.
पिंक साडी विथ साऊथ इंडियन दागिन्यांमध्ये अमृता फारचं सुंदर दिसली. त्याचप्रमाणे तिनं साडीला थोडासा इंडोवेस्टर्न लुक देण्याचा प्रयत्न केला होता.
लग्न विधींसाठी अमृतानं खास पारंपरिक पिवळी नऊवारी साडी नेसली होती.
पिवळी साडी त्याला निळी काठ आणि निळ ब्लाऊज. माथी मुंडावळ्या, नाकात साजीशी नथ, फुलांच्या माळा आणि नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थितीत अमृता आणि नीलच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या.
अमृता आणि अक्षय दोघेही लग्नात फार खुश होते. नव्या नवरा नवरीचा ग्लो दोघांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
दोघांचे लग्नातील खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अमृताच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत भरभरुन शुभेच्छा दिल्यात.
अमृताच्या लग्नाला तिच्या मालिकेतील आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि मित्र मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
अमृता आणि नीलच्या नव्या आयुष्यासाठी दोघांना सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव होतोय.