अनेक वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर परतलेली अभिनेत्री दीपा परब.
झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत ती सध्या अश्विनीची भूमिका साकारत आहे.
मालिकेतील अश्विनी आणि खऱ्या आयुष्यातील दीपा यांच्यात बरंचसं साम्य असल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं आहे.
अश्विनीप्रमाणेच दीपाचं तिच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. ती देखील घर, मुलगा आणि नवरा या सगळ्यांचं आवरून शुटींग येते.
अभिनेत्री दीपा परबच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत.
मालिकेतील अश्विनी म्हणजेच खऱ्या आयुष्यातील दीपा विना मेकअप देखील खुप सुंदर दिसते.
तिच्या नो मेकअप लुक्समधील फोटोंनाही फॅन्सनी पसंती दिली आहे.
दीपा लवकरच 'बाईपण भारी देवा' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.