क्रिमिनल जस्टिस: या वेबसीरिज चा पहिला सीझन 2019 मध्ये रिलीज झाला होता. यात विक्रांत मॅसी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका कॅब ड्रायव्हरवर प्रवाशाच्या मृत्यूचा आरोप लागतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्यचं पलटून जाते. ही सीरीज डिस्ने प्लस हॉट स्टारवर उपलब्ध आहे. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
द ग्रेट इंडियन मर्डर: ही वेब सिरीज एका व्यावसायिकाच्या हत्येभोवती फिरते. प्रतीक गांधी, ऋचा चढ्ढा, रघुबीर यादव या स्टार्सनी यात काम केले आहे. या मालिकेचा क्लायमॅक्स मन हेलावून जातो. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही 'द ग्रेट इंडियन मर्डर' पाहू शकता. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
अरण्यक : रवीना टंडन या वेब सिरीजमध्ये पोलीस स्टेशनच्या एसएचओ कस्तुरी डोगराची भूमिका साकारत आहे. याची कथा एका परदेशी पर्यटकाच्या मुलीच्या हत्येपासून सुरू होते. हे पाहून, खूनी कोण आहे हे शेवटपर्यंत समजत नाही. ही एक मर्डर मिस्ट्री सीरीज आहे, ज्याचा तुम्ही Netflix वर आनंद घेऊ शकता. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
दहाड: सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा आणि गुलशन देवय्या स्टारर 'दहाड' ही सीरीज एका सीरियल किलरवर आधारित आहे. एक माणूस आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींना अडकवतो आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या करतो, असे दाखवण्यात आले आहे. ही सीरीज Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
कँडी: या सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिजमध्ये एका शालेय विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी रत्ना संखवार (रिचा चढ्ढा) तपासात गुंतलेली आहे. 'कँडी' सीरीजची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तुम्ही ते OTT प्लॅटफॉर्म Voot वर पाहू शकता. (फोटो क्रेडिट्स: IMDB)